Bigg Boss 16 | पुन्हा एकदा बिग बाॅसच्या घरात श्रीजिता डे करणार एन्ट्री? शोमध्ये मोठा ट्विस्ट

| Updated on: Dec 07, 2022 | 7:47 PM

बिग बाॅसच्या घरातील एखाद्या स्पर्धकाचा क्लास काढणे हे तिच्या चाहत्यांना देखील अजिबात आवडले नव्हते.

Bigg Boss 16 | पुन्हा एकदा बिग बाॅसच्या घरात श्रीजिता डे करणार एन्ट्री? शोमध्ये मोठा ट्विस्ट
Follow us on

मुंबई : काही दिवसांपूर्वी बिग बाॅसच्या घरात स्पर्धेक म्हणून श्रीजिता डे ही दाखल झाली होती. परंतू गोरी हिच्या क्लासबद्दल बोलल्यामुळे श्रीजिताला नाॅमिनेट करण्यात आले होते. बिग बाॅसच्या घरातील एखाद्या स्पर्धकाचा क्लास काढणे हे तिच्या चाहत्यांना देखील अजिबात आवडले नव्हते. या सर्व प्रकरणानंतर श्रीजिता डे हिला घरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, श्रीजिता डे जेंव्हापासून बाहेर गेलीये, तेंव्हापासून सतत बिग बाॅसच्या घरातील गोष्टींवर भाष्य करत आहे.

काही दिवसांपासून सतत चर्चा सुरू आहेत की, श्रीजिता डे ही बिग बाॅसच्या घरात वाइल्डकार्ड म्हणून एन्ट्री घेणार आहे. विशेष म्हणजे आजच ती घरात दाखल होणार आहे. श्रीजिता परत एकदा घरात गेल्यानंतर मोठा धमाका होणार हे नक्की आहे.

बिग बाॅसच्या घरात अगोदरपासूनच मोठा हंगामा होत आहे. अर्चना गाैतम विषय नसताना देखील सर्वांसोबत भांडणे करत असते. टीआरपीमध्येही हे सीजन धमाका करताना दिसत आहे.

गेल्या काही सीजनमध्ये जे घडले नाही ते यंदाच्या सीजनमध्ये घडताना दिसत आहे. बिग बाॅस 15 टीआरपीमध्ये काही खास धमाका करू शकले नव्हते शेवटपर्यंत. मात्र, हे सीजन टीआरपीमध्येही चांगली कमाल करत आहे.

अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून बिग बाॅसच्या घरात वाद होताना दिसत आहेत. आता खरोखरच श्रीजिता डे ही बिग बाॅसच्या घरात वाइल्डकार्ड एन्ट्री करते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

एकदा बिग बाॅसच्या घराबाहेर जाऊन परत आल्याने श्रीजिताच्या गेममध्ये नक्कीच काही सुधारणा होतील. बिग बाॅसच्या घरात यापूर्वी अनेक गोष्टींवरून टीना दत्ता आणि श्रीजिता डे यांच्यामध्ये खटके उडाले आहेत.