Nave Lakshya: ‘नवे लक्ष्य’ मालिकेत दिसणार स्टार प्रवाहच्या मालिकांमधील पोलीस अधिकारी; युनिट 9 ला मिळणार जाबाज पोलिसांची साथ

| Updated on: Jul 22, 2022 | 10:02 AM

निष्पाप मुलींना फसवणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी हे पोलीस अधिकारी एकत्र आले आहेत. येत्या रविवारी म्हणजेच 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 7  वाजता आणि रात्री 10 वाजता हा विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Nave Lakshya: नवे लक्ष्य मालिकेत दिसणार स्टार प्रवाहच्या मालिकांमधील पोलीस अधिकारी; युनिट 9 ला मिळणार जाबाज पोलिसांची साथ
'नवे लक्ष्य' मालिकेत दिसणार स्टार प्रवाहच्या मालिकांमधील पोलीस अधिकारी
Image Credit source: Instagram
Follow us on

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ (Nave Lakshya) मालिकेतील ‘युनिट 9’ नवनव्या गुन्ह्यांचा शोध तपास करत असतात. यावेळी युनिट 9 च्या टीमला जाबाज पोलिसांची साथ मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) मालिकेतील एएसपी किर्ती, ‘लग्नाची बेडी’ (Lagnachi Bedi) मालिकेतील एसपी राघव आणि ‘अबोली’ मालिकेतील सीनियर पीआय अंकुश एका सेक्स स्कॅण्डलच्या तपासासाठी युनिट 9 च्या टीमची साथ देणार आहेत. निष्पाप मुलींना फसवणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी हे पोलीस अधिकारी एकत्र आले आहेत. येत्या रविवारी म्हणजेच 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 7  वाजता आणि रात्री 10 वाजता हा विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

आतापर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांना आपण त्यांच्या मालिकांमध्ये गुन्ह्यांचा तपास करताना पाहिलं आहे. मात्र ‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या निमित्ताने हे सगळे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यामुळे महाएपिसोडची रंगत वाढणार हे नक्की. स्टार प्रवाह वाहिनीवर काही वर्षांपूर्वी ‘लक्ष्य’ या मालिकेतून युनिट 8 टीमची शौर्यगाथा प्रेक्षकांनी अनुभवली होती आणि त्याला भरभरुन प्रतिसादही दिला होता. त्यामुळे ‘नवे लक्ष्य’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणली. नवं कथानक आणि नव्या टीमसह युनिट 9 ची टीम सज्ज झाली आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

कमी लोकसंख्या असलेल्या देशात आकाशपाताळ एक करूनही जेव्हा गुन्हेगार सापडत नाही तेंव्हा त्या देशातील पोलिसांना मुंबई पोलिसांचे उदाहरण दिले जाते. 135 करोड लोकसंख्या असलेल्या देशात गुन्हेगार शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधणे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य जपत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं. महाराष्ट्राच्या या खऱ्या सुपरहिरोंचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे.