रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, ‘तारख मेहता का उल्टा चश्मा’मधील लोकप्रिय अभिनेता कुठे गेला?

| Updated on: Apr 27, 2024 | 12:13 AM

'तारख मेहता का उल्टा चश्मा' या प्रसिद्धी टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेता गुरुचरण सिंह हे गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहेत. गुरुचरण सिंह हे मालिकेत रोशन सिंह सोढी नावाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय आहेत.

रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, तारख मेहता का उल्टा चश्मामधील लोकप्रिय अभिनेता कुठे गेला?
रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता
Follow us on

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’ आणि रोशन सिंह सोढी कुणाला माहिती नसणार, असं कधीच होणार नाही. जसा जेठालाल लोकप्रिय आहे, तसाच रोशन सिंह सोढी हा देखील प्रसिद्ध आहे. पण रोशन सिंह सोढी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात रुजवणारा अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एवढा लोकप्रिय अभिनेता नेमका गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित होतोय. गुरुचरण यांचा शोध पोलीसही घेत आहेत. पण त्यांचा तपास अजून लागलेला नाही. गुरुचरण सिंह यांच्या वडिलांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. गुरुचरण बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. गुरुचरण यांचा लवकर शोध लागावा यासाठी अनेकांकडून प्रार्थना केली जात आहे.

गुरुचरण 22 एप्रिलला दिल्ली विमानतळावर शेवटचे दिसले होते. दिल्ली विमानतळावरुन ते मुंबईला येणार होते. पण ते मुंबईला पोहोचलेच नाहीत. याशिवाय ते तेव्हापासून घरीदेखील पोहोचले नाहीत. गुरुचरण यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “माझा मुलगा गरुचरण सिंह, ज्याचं वय 50 वर्ष आहे, तो 22 एप्रिलच्या सकाळी 8.30 वाजता मुंबई विमानतळाच्या दिशेला निघाला होता. पण तो मुंबईला पोहोचला नाही आणि घरीदेखील परतला नाही. त्याच्याशी फोनवरही संपर्क होऊ शकलेला नाही. त्याची मानसिक अवस्था चांगली आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. पण तो बेपत्ता आहे.”

2013 मध्ये मालिका सोडलेली, पण…

गुरुचरण सिंह यांनी ‘तारख मेहता का उल्टा चश्मा” या टीव्ही मालिकेत रोशन सिंह सोढी नावाची भूमिका साकारली होती. रोशन सिंह सोढी हा नेहमी पार्टी करण्याच्या मूडमध्ये असायचा. तसचे तो कधीच आपल्या पत्नीसोबतचं प्रेम व्यक्त करण्यात मागे असायचा नाही. तो मालिकेतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय भूमिकांपैकी एक होता. पण गुरुचरण सिंह यांनी 2013 मध्ये मालिका सोडली होती. पुढे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ते पुन्हा मालिकेत आले होते. त्यानंतर त्यांनी 2020 मध्ये मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याऐवजी अभिनेता बलविंदर सिंह यांना कास्ट करण्यात आलं होतं.

2020 मध्ये पुन्हा मालिका सोडली, कारण काय?

गुरुचरण सिंह यांनी इटाईम्सला 2021 मध्ये दिलेल्या मुलाखतीत मालिका का सोडली? यामागील ओझरतं कारण सांगितलं होतं. मी जेव्हा मालिका सोडली तेव्हा माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया होणार होती. काही गोष्टी होत्या, ज्याबद्दल बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया गुरुचरण सिंह यांनी दिली होती. विशेष म्हणजे याबाबत लोकांमध्ये वेगळी चर्चा सुरु होती. गुरुचरण सिंह यांना उशिराने कामाचे पेमेंट मिळत असल्याने त्यांनी मालिका सोडल्याची चर्चा होती. पण गुरुचरण यांनी त्याबाबत कधीच भाष्य केलं नाही.