शैलेश लोढा याला मिळाले नाहीत मेहनतीचे पैसे? तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला सोडले झाले तब्बल सात महिने…

| Updated on: Jan 31, 2023 | 7:41 PM

गेल्या काही दिवसांपासून मालिकेमधील अनेक कलाकार हे मालिकेला कायमची सोडचिठ्ठी देऊन जाताना दिसत आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये तारक मेहता हे एक महत्वाचे पात्र आहे.

शैलेश लोढा याला मिळाले नाहीत मेहनतीचे पैसे? तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला सोडले झाले तब्बल सात महिने...
Follow us on

मुंबई : टिव्ही क्षेत्रातील जबरदस्त मालिका म्हणून सोनी सब टीव्हीच्या तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेकडे बघितले जाते. तब्बल १४ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचा चाहता वर्षही मोठा आहे. घरातील प्रत्येक वयाच्या व्यक्तीला ही मालिका आवडते. ही मालिका फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत नाही तर अनेक सामाजिक संदेश मालिकेमधून दिले जातात. या मालिकेचे एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे घरातील सर्वच सदस्यांसोबत बसून ही मालिका आपण पाहू शकतो. मालिकेत मुंबईमध्ये असलेली गोकुळधाम सोसायटी दाखवण्यात आलीये. या सोसायटीमध्ये देशातील विविध राज्यामधील लोक राहतात. विशेष म्हणजे सर्वांचा धर्म वेगळा असूनही सर्व कशाप्रकारे चांगले राहतात हे दाखविले आहे. या मालिकेमधील प्रत्येक पात्र खास आहे आणि सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांवर एक खास छाप नक्की सोडली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेमधील अनेक कलाकार हे मालिकेला कायमची सोडचिठ्ठी देऊन जाताना दिसत आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये तारक मेहता हे एक महत्वाचे पात्र आहे. तारक मेहता हे जेठालाल याचे परमित्र असून मित्राच्या प्रत्येक समस्येमध्ये ते कायमचसोबत असतात. चाहत्यांना देखील तारक मेहता आणि जेठालाल यांची मैत्री प्रचंड आवडते.

मालिकेमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, तारक मेहता हे एक लेख आहेत. मालिकेमध्ये तारक मेहताच्या पत्नीचे नाव अंजली मेहता असे असून तारक मेहताच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अंजली वेगवेगळे डाएट प्लॅन तयार करते.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सुरू झाल्यापासून शैलेश लोढा हे तारक मेहताचे पात्र साकारत होते. विशेष म्हणजे १४ वर्ष या पात्रामधून शैलेश लोढाने प्रेक्षकांचे मनोरंजन हे केले आहे.

काही दिवसांपूर्वीच शैलेश लोढाने मालिकेला कायमचा रामराम केला. शैलेश लोढा याचे काही वाद झाल्याने अचानक मालिकेला सोडचिठ्ठी देत शैलेश लोढा याने मोठा धक्का दिला. मात्र, आता शैलेश लोढाबद्दल मोठी एक बातमी पुढे येत आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका शैलेश लोढा यांनी सोडून आता सात महिने जवळपास होऊन गेले आहेत. सात महिन्यांनंतरही शैलेश लोढा याला मालिकेची फीस मिळाली नाहीये.
रिपोर्टनुसार शैलेश लोढा याचे तब्बल एक वर्षांपासूनही अधिक काळाचे पैसे अडकले आहेत.

इतकेच नाहीतर अंजली मेहताच्या भूमिकेत असलेल्या नेहा मेहता हिचे देखील ३५ ते ४० लाख रूपये अजून निर्मात्यांनी दिले नाहीत. शैलेश लोढा याची मोठी तगडी रक्कम तारक मेहताच्या निर्मात्यांना द्यायची आहे.