मुंबई : बिग बाॅस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. बिग बाॅस 15 जिंकल्यानंतर तेजस्वी हिला खरी ओळख मिळालीये. इतकेच नाहीतर अनेक चित्रपटांच्या आॅफरही तेजस्वीला येताना दिसत आहेत. बिग बाॅसची विजेती झाल्यानंतर तेजस्वी हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये जबरदस्त वाढ झालीये. सोशल मीडियावरही तेजस्वी बोल्ड फोटो कायमच शेअर करते.
काही दिवसांपूर्वी तेजस्वी आणि करण यांनी दुबईला घर खरेदी केले आहे. त्यापूर्वी तेजस्वी हिने गोव्यामध्येही घर खरेदी केले. तेजस्वी सध्या एकता कपूरचा नागिन हा शो करत आहे.
यापूर्वी तेजस्वी हिने अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. इतकेच नाहीतर खतरो के खिलाडीमध्येही तेजस्वी दिसली होती. सध्या सोशल मीडियावर तेजस्वीचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये तेजस्वी घाबरलेली दिसत आहे.
एका कार्यक्रमामध्ये तेजस्वी सहभागी झाली होती. तेथून बाहेर पडताना तेजस्वीला पाहून पैपराजी जवळ आले. मात्र, यावेळी मोठा गोंधळ उडाला. यामध्ये थोडी धक्काबुक्की देखील झाली.
हे पाहून तेजस्वीचे बॉडीगॉर्ड पुढे आले आणि या गर्दीमधून तिला बाहेर काढले. मात्र, यावेळी एक बॉडीगॉर्ड मी आता तुम्हाला पकडून मारेल असे बोलताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
करण कुंद्रा आणि तेजस्वी यांचे चाहते यांच्या लग्नाची वाट पाहात आहेत. बिग बाॅसच्या घरामध्ये यांचे प्रेम सुरू झाले. इतकेच नाहीतर अजूनही दोघे अनेकदा फिरताना दिसतात. करण नेहमीच तेजस्वीला नागिनच्या सेटवरून घ्यायला देखील जातो.