मुंबई : कौन बनेगा करोडपतीच्या (Kaun Banega Crorepati) सीजनची दणक्यात सुरूवात झालीये. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन या सीजनला होस्ट करत आहेत. कौन बनेगा करोडपतीचा 11 ऑक्टोबरचा एपिसोड खास ठरणार आहे. या एपिसोडलामध्ये (Episode) अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन हजेरी लावणार आहेत. यादरम्यान बिग बी भावूक होताना दिसणार आहेत. इतकेच नाही तर जया बच्चन यावेळी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे अनेक राज खुले करणार आहेत. यामुळेच हा एपिसोड धमाकेदार ठरणार आहे.
नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिषेक बच्चन अगोदर कौन बनेगा करोडपतीमध्ये हजेरी लावतो. त्यानंतर अचानक जया बच्चन येतात, जया बच्चन यांना पाहून अमिताभ बच्चन भावूक होतात. त्यानंतर अमिताभ बच्चन जया बच्चनजवळ जातात आणि त्यांची गळाभेट घेतात. परंतू यादरम्यान अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाले. 11 ऑक्टोबरचा एपिसोड खास असणार आहे. कारण यादिवशी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे.
अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपतीमधील हा प्रोमो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा प्रोमो सोनी लिव्हच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये नेमकी काय मस्ती करतात हे बघण्यासारखे ठरणार आहे. मात्र, यासाठी प्रेक्षकांना 11 तारखेची वाट पाहावी लागणार आहे.