मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन करते आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेमधील अनेक कलाकार हे मालिकेला कायमचा अलविदा करून जात आहेत. आता शैलेश लोढा यांच्यानंतर मालिकेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका साकारणारा कलाकार मालिकेमधून बाहेर पडलाय. दया बेन अर्थात दिशा हिची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक सातत्याने वाट पाहात आहेत. मात्र, दया बेन मालिकेमध्ये येण्याच्या अगोदरच टप्पूने मालिकेला रामराम ठोकलाय.
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, टप्पू अर्थात राज अनादकट याने मालिका सोडली आहे. परंतू या सर्व अफवा असल्याचे सांगितले जात होते. आता फायनली राज अनादकट याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांसोबत महत्वाची माहिती शेअर केलीये.
राज याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहिर केले की, तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसोबत असलेला त्याचा कॉन्ट्रॅक्ट हा संपला असून तो यापुढे तारक मेहतामध्ये दिसणार नाहीये.
राज याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, तारक मेहतामध्ये मालिकेमध्ये काम करत असताना मला अनेक मित्र भेटले आणि अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. हा काळ माझ्या करिअरमध्ये सर्वात बेस्ट होता.
मी सर्व लोकांना धन्यवाद देतो की, या माझ्या प्रवासामध्ये त्यांनी मला सपोर्ट केला. तारक मेहताची पुर्ण टीम, फॅमिली, माझे मित्र यांनी मला कायम सपोर्ट केला. तुम्ही सर्वांनी मला टप्पूच्या भूमिकेमध्ये स्विकारले आणि प्रेम दिले, त्याबद्दल धन्यवाद…
पुढे राज याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, खरोखरच तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मला हे सर्व करण्याची हिम्मत मिळाली. तारक मेहताच्या संपूर्ण टीमला पुढच्या प्रवासासाठी मी शुभेच्छा देतो, असेही राज याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.