मुंबई : राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये सध्या मोठे वादळ आले असून काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले. दुसरीकडे राखी सावंत (Rakhi Sawant) हिने तिचा पती आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर आदिल दुर्रानी आणि राखी सावंत यांचे भांडण थेट कोर्टात पोहचले असून आदिल दुर्रानी याला अटक करून कोर्टात हजरही करण्यात आले. राखी सावंत हिने सात महिन्यांपूर्वी आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केले. अगोदर कोर्टात आणि नंतर निकाह राखा सावंत हिने आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्यासोबत केला. लग्नानंतर राखी सावंत हिने आपल्या नावामध्येही बदल केला. लग्नानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म स्वीकारला. आदिल दुर्रानी याच्यासोबत केलेले लग्न तब्बल सात महिने राखी सावंत हिने सर्वांपासून लपवून ठेवले. मात्र, बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर तिने अचानकपणे लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना मोठा धक्का दिला. सुरूवातीपासूनच आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिच्यासोबत झालेले लग्न स्वीकारत नव्हता. मात्र, त्यानंतर त्याने राखी सावंत हिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. आता राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर काही गंभीर आरोप केले.
आदिल दुर्रानी याच्या विरोधात तक्रार देत राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याने आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले. आदिल दुर्रानी हा जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. दुसरीकडे आदिल दुर्रानी याला जामीन मिळू नये, यासाठी राखी सावंत प्रयत्न करत आहे.
राखी सावंत हिने पैपराजींना बोलताना म्हटले की, आदिल दुर्रानी याला जामीन मिळून नये. माझ्याकडे पूर्ण कागदपत्र आहेत. माझ्यावर खूप जास्त अत्याचार आदिल दुर्रानी याने केले असल्याचे देखील राखी सावंत म्हणाली आहे.
राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर आरोप करत म्हटले होते की, आदिल दुर्रानी याने माझ्याकडून दीड कोटी रूपये घेतले आहेत. मी याचे सर्व पुरावे हे पोलिसांना दिले आहेत. सर्व बँक स्टेटमेंट माझ्याकडे आहेत जे मी पोलिसांना दिले आहेत.
या दरम्यान राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर मोठा आरोप करत म्हटले आहे की, आदिल दुर्रानी याने मला धोका दिला असून त्याचे अगोदरच लग्न झाले होते. आताही त्याचे एका मुलीसोबत अफेअर सुरू आहे.
राखी सावंत हिच्या आईच्या निधनानंतर आदिल दुर्रानी राखीसोबत दिसत होता. मात्र, त्यानंतर राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप केले. अगोदर जिमबाहेरही राखी आणि आदिल अनेकदा स्पाॅट व्हायचे.