मुंबई : बिग बाॅस १६ टीआरपीमध्ये धमाका करत आहे. आतापर्यंतचे बिग बाॅसच्या जवळपास सर्वच सीजनचे रेकाॅर्ड टीआरपीमध्ये बिग बाॅसचे १६ (Bigg Boss 16) वे सीजन तोडताना दिसत आहे. यावेळी जरी घरामध्ये फेमस असे चेहरे नसतील परंतू घरातील सदस्य हे प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करताना दिसत आहेत. अर्चना गाैतम ही बिग बाॅस १६ मधील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून पुढे आलीये. काही दिवसांपूर्वी बिग बाॅसच्या घरात झालेल्या एका वादामध्ये तिने थेट शिव ठाकरे (Shiv Thakare) याचा गळा पकडला होता. यानंतर तिला बेघर करण्यात आले होते. परंतू तीन दिवसांनंतर परत बिग बाॅसने तिला घरात आणले. प्रियंका चाैधरी देखील घरामध्ये कारण नसताना अनेकदा भांडताना दिसते. यावेळी टीना दत्ता आणि प्रियंका चाैधरी यांच्या निशाण्यावर शालिन भनोट (Shalin Bhanot) हा आहे.
बिग बाॅस १६ च्या फिनालेला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. घरामध्ये सध्या आठ स्पर्धेक असून यामध्ये निम्रत काैर, एमसी स्टॅन, प्रियंका चाैधरी, शिव ठाकरे, शालिन भनोट, अर्चना गाैतम, सुंबुल ताैकीर आणि टीना दत्ता हे आहेत.
गेल्या आठवड्यामध्ये बिग बाॅसने घरातील सदस्यांना मोठा अधिकार देत चारपैकी एका सदस्याला बेघर करण्यास सांगितले होते. यावेळी घरातील सदस्यांनी मिळून निर्णय घेत साैंदर्या शर्मा हिला बेघर केले होते.
Shalin aur Tina ke beech chhidi jung. ?
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9 baje, sirf #Colors par. #BB16 #BiggBoss@Beingsalmankhan@Chingssecret #NimritKaurAhluwalia @BhanotShalin @iamTinaDatta pic.twitter.com/jVTzIJUP0V
— Bigg Boss (@BiggBoss) January 26, 2023
नुकताच बिग बाॅसच्या घरात नाॅमिनेशनची प्रक्रिया पार पडलीये. यामध्ये या आठवड्यामध्ये शिव ठाकरे, प्रियंका चाैधरी, शालिन भनोट आणि टीना दत्ता हे नाॅमिनेट झाले आहेत.
दरवेळी नाॅमिनेट सदस्यांपैकी एक सदस्य हा बेघर होतो. परंतू एक रिपोर्टनुसार यावेळी बिग बाॅस घरातील सदस्यांना मोठा झटका देत एकाच आठवड्यामध्ये दोन सदस्य हे बेघर होणार असल्याचे सांगितले आहे.
एका रिपोर्टनुसार शालिन भनोट आणि टीना दत्ता हे दोघे बेघर होतील. गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅसच्या घरात शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यामध्ये मोठा वाद होताना दिसत आहे.