मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होतात. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे लोकांच्या टिकेचा सामना करावा लागतो. मात्र, कायमच उर्फी जावेद ही तिच्यावर होणाऱ्या टिकेकडे दुर्लक्ष करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा आहे की, उर्फी जावेद ही खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होणार आहे. उर्फी जावेद हिला खतरो के खिलाडीचे आॅफरही आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद ही खतरो के खिलाडीच्या आॅफिस बाहेरही स्पाॅट झाली होती. उर्फी जावेद हे काही दिवसांपासून चर्चेत राहणारे नाव आहे.
उर्फी जावेद हिने अत्यंत कमी वेळामध्ये स्वत: ची एक वेगळे ओळख नक्कीच निर्माण केलीये. उर्फी जावेद ही कधी काय कपडे घालेल याचा नेम नाही. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडताना उर्फी जावेद रडताना देखील दिसली.
कालच उर्फी जावेद हिचे नवे फोटोशूट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. लाल रंगाचे केस, काळा ड्रेस आणि विचित्र मेकअप हा उर्फी जावेद हिने केला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. अनेकांनी हा काय विचित्र प्रकार असल्याचे प्रश्न उर्फी जावेद हिला विचारले.
नुकताच सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. कारण या व्हिडीओमध्ये चक्क उर्फी जावेद हिचे हात गायब झाले असून तिचे हात दिसत नाहीयेत. यामुळे अनेकांनी उर्फी जावेद हिला हात कुठे असल्याचे विचारले आहे.
अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत उर्फी जावेदला तिच्या ड्रेसिंग स्टाईलवरून टार्गेट केले आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, काल भुवया गायब होत्या आणि आज हात…दुसऱ्याने लिहिले की, ही बाई कधी काय करेल याचा अजिबात नेम नाहीये. तिसऱ्याने लिहिले की, हिचे कपडे डिजाईन नेमके करते कोण?
बऱ्याच वेळा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांवरून थेट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. मात्र, उर्फी जावेद कायमच अशा धमक्यांकडे दुर्लक्ष करताना दिसते. काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरणे उर्फी जावेद हिला थेट बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला बिहारमधून अटक केली.