मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधील अजून एक अभिनेत्री लवकरच बाळाला जन्म देणार आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सर्वांची आवडती आणि बिग बाॅस विजेती गौहर खान आहे. होय…तुम्ही खरंच ऐकलंय…गौहर खान ही 39 व्या वर्षी बाळाला जन्म देत आहे. गौहर खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. इतकेच नाहीतर यासोबतच तिने एक व्हिडीओ शेअर केलाय. गौहर खानची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून चाहते गौहर खानचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
गौहर खान ही बिग बाॅस 7 ची विजेती आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील गौहर खान प्रसिध्द चेहरा आहे. गौहर खान हिने 2020 मध्ये कोरिओग्राफर जैद दरबारसोबत लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या की, गौहर खान प्रेग्नेंट आहे.
गौहर खान हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, बिस्मिल्लाह हीर रहमान नीर रहीम… तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि प्रार्थनांची गरज आहे…माशा अल्लाह!@pixiedustdesign लग्नापासून या सुंदर नवीन प्रवासापर्यंत आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे…
आता गाैहर खानची हिच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकेच नाहीतर गौहर खान हिचे चाहते आनंदात असून या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
दिपीका कक्कड देखील प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा या सातत्याने सुरू आहेत. मात्र, दिपीका हिने यावर अजून काहीच भाष्य केले नाहीये. मात्र, गेल्या काही दिवसांचे दिपीका हिचे व्हिडीओ पाहून चाहते अंदाजा लावताना दिसत आहेत.