मुंबई : बिग बाॅस १६ च्या फिनालेला अवघा एक दिवस शिल्लक आहे. सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये ग्रँड फिनालेबद्दल मोठी उत्सुकता दिसत आहे. विशेष म्हणजे हा ग्रँड फिनाले (Grand Finale) अधिक खास करण्यासाठी निर्मात्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. बिग बाॅसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रँड फिनाले हा तब्बल पाच तास चालणार आहे. या फिनालेमध्ये घरातील सदस्यांसोबतच बिग बाॅसच्या घरामधून बाहेर पडलेल्या स्पर्धेकांचे डान्स होणार आहेत. बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) चा ग्रँड फिनाले जबरदस्त आणि धमाकेदार होईल. बिग बाॅसच्या घरात सध्या एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियंका चाैधरी आणि शालिन भनोट हे स्पर्धेक आहेत. बिग बाॅसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक चांगली मैत्री या सीजनमध्ये बघायला मिळाली. एमसी स्टॅन, शिव ठाकरे, साजिद खान, अब्दु रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्यामधील मैत्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात अनेक चढउतार आल्यानंतरही यांची मैत्री कायमच राहिली. इतकेच नाही तर बिग बाॅसच्या घरात असताना निम्रत काैर हिने थेट शिव ठाकरे विजेता व्हावा म्हटले होते. एमसी स्टॅन देखील कायमच म्हणतो की, माझा भाऊ शिव ठाकरे हा विजेता झाला पाहिजे.
सोशल मीडियावर सतत चर्चा आहे की, बिग बाॅस १६ चा विजेता कोण होणार? सोशल मीडियावर शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांना चाहते मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसत आहेत. प्रियंका चाैधरी हिचे नाव देखील चर्चेत आहे.
बिग बाॅसचे सीजन १, १४ आणि १५ मध्ये सहभागी झालेली राखी सावंत हिने बिग बाॅसच्या विजेत्याबद्दल मोठे विधान केले आहे. नुकताच पैपराजी यांनी राखी सावंत हिला विचारले की, बिग बाॅसचा विजेता कोण होणार?
यावर उत्तर देताना राखी सावंत हिने शिव ठाकरे आणि शालिन भनोट यांचे नाव घेतले आहे. राखी सावंत जरी बिग बाॅसची विजेती झाली नसली तरीही राखी बिग बाॅसच्या तीन सीजनमध्ये सहभागी झाली होती.
बिग बाॅसच्या घरात सध्या पाच स्पर्धेक असून एमसी स्टॅन याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. तर शिव ठाकरे याने धमाकेदार खेळ बिग बाॅसच्या घरात खेळला आहे. प्रियंका चाैधरी हिने देखील बिग बाॅसच्या घरात चांगला गेम खेळला आहे.
शालिन भनोट आणि टीना दत्ता हिची लव्ह स्टोरी सर्वांनाच माहितीये. शालिन भनोट याचाही गेम चांगला होता. अर्चना गाैतम कायमच घरामध्ये भांडताना दिसली. मात्र, तिने चाहत्यांचे मनोरंजनही मोठ्या प्रमाणात केले आहे.