नाॅमिनेशन टास्कमध्ये धमाका, चक्क हे स्पर्धेक झाले या आठवड्यात नाॅमिनेट

| Updated on: Dec 13, 2022 | 5:13 PM

टीना घरात आल्यानंतर तिचा घरातील मित्र शालिन भनोट यांच्यासोबत जोरदार भांडणे करते.

नाॅमिनेशन टास्कमध्ये धमाका, चक्क हे स्पर्धेक झाले या आठवड्यात नाॅमिनेट
Follow us on

मुंबई : विकेंडच्या वारमध्ये टीना दत्ता ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडली होती. परंतू परत एकदा बिग बाॅसने टीनाला घरात आणले आहे. टीना घरात आल्यानंतर तिचा घरातील मित्र शालिन भनोट यांच्यासोबत जोरदार भांडणे करते. टीनाला हे समजले आहे की, तिच्या मागे शालिन काय बोलतो. टीना शालिनला म्हणते की तू कोनाचाच होऊ शकत नाही. यावेळी शालिन टीना हिला अनेक गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतो. आता घरामध्ये मोठा हंगामा झालाय.

सोशल मीडियावर नुकताच बिग बाॅसचा एक प्रोमो व्हायरल झालाय. यामध्ये घरात या आठवड्याची नाॅमिनेशन प्रक्रिया पार पडलीये. या आठवड्यात बिग बाॅसने घरातील सदस्यांसोबत मोठा गेम खेळला आहे.

या आठवड्यात घरात कोणी एक राजा नसून तीन जणांच्या हातामध्ये घरातील सुत्रे दिली आहेत. विशेष म्हणजे यासाठी एक टास्क देण्यात आला. या टास्कमध्ये टीना दत्ता, सुंबुल ताैकीर आणि साैंदर्या शर्मा या जिंकल्या.

बिग बाॅसच्या घराची सुत्रे आता टीना दत्ता, सुंबुल ताैकीर आणि साैंदर्या शर्मा यांच्या हातामध्ये आली आहेत. शालिन भनोट हा आता सुंबुलसोबत चांगले राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

रिपोर्टनुसार या आठवड्यामध्ये शालिन भनोट, शिव ठाकरे, साजिद खान आणि टीना दत्ता नाॅमिनेट झाले आहेत. टीना घराची कॅप्टन असूनही स्वत:ला वाचू शकली नसल्याचे सांगितले जात आहे.

नाॅमिनेशन टास्कवेळी प्रियंका चाैधरी आणि सुंबुल यांच्यामध्ये जोरदार वाद होताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर प्रियंका यावेळी सुंबुलवर अनेक आरोप करते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.