झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. सौरभ आणि अनामिकाच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना आवडतेय. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना रंजक वाटत आहेत. सौरभ, अनामिका या प्रमुख व्यक्तिरेखांप्रमाणेच पुष्पावल्ली, चंद्रलेखा, चंदू चिमणे या व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील सौरभचा मित्र चंदू चिमणे याची भूमिका अभिनेता किरण भालेराव (Kiran Bhalerao) साकारत असून त्याची विनोदी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतेय. किरणचा चेहरा हा प्रेक्षकांच्या ओळखीचा आहे.
अभिनेता किरण भालेराव हा २००९ मध्ये गाजलेल्या महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या पहिल्या पर्वाचा स्पर्धक होता. अभिनयाची आवड जोपासण्यासाठी किरणने त्याची नोकरी देखील सोडली. पण त्याच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे त्याने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं. तू तेव्हा तशी मधील त्याने साकारलेला चंदू देखील प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटतो.
मालिका विश्वातील दिग्दर्शकाच्या यादीत आघाडीवर असणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. याआधी त्यांच्या ‘वादळवाट’, ‘अवघाचि हा संसार’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘फुलपाखरू’ या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आणि त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. ‘मन उडू उडू झालं’ या त्यांच्या मालिकेनेदेखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळस्कर मुख्य भूमिकेत आहेत. 20 मार्चपासून रात्री 8 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा:
शाहरुख, सलमान, सैफ, अक्षयने सौदी अरबच्या मंत्र्यांची घेतली भेट; नेमकं काय आहे कारण?
वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया; ‘मुंबई आता लवकरच..’