मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडालीये. बालकलाकार म्हणून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. विशेष म्हणजे तुनिशाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येच्या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणात विविध खुलासे होत आहेत. तुनिशा शर्माची आई वनिता शर्मा हिने अभिनेता शीजान खान याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. भादंवि कलम 306 अन्वये शीजान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता याची FIR काॅपी पुढे आलीये.
FIR कॉपीनुसार तुनिषा शर्मा आणि शीजान खान हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे पुढे आले आहे. 15 दिवसांपूर्वीच तुनिषा शर्मा हिचे शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाले होते आणि यामुळेच ही तणावामध्ये होती.
शीजान खान याच्यासोबतत ब्रेकअप झाल्यामुळे ती तणावामध्ये होती आणि यामध्येच तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हणण्यात आले आहे. आता ही FIR कॉपी व्हायरल होताना दिसत आहे.
FIR कॉपीनुसार तुनिषा शर्माच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नाहीयेत. फाशी घेतल्यामुळे गुदमरल्याने तुनिषाचा मृत्यू झाल्याचे FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे. तुनिषाची आई वनिता यांनी अभिनेता शीजान खान याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.
तुनिषा शर्मा हिने मालिकेच्या सेटवरच फाशी घेत जीवनयात्रा संपली आहे. तुनिषा शर्मा हिने कमी वयामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केली होती.