मुंबई : बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिने २४ डिसेंबरला आत्महत्या केलीये. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाहीतर माझ्या मुलीच्या आत्महत्येला शीजान खान हाच कारणीभूत असल्याचे तिच्या आईने म्हटले. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक केली आणि आता तो कोठडीमध्ये आहे. पोलिस शीजान खान याची चाैकशी करत आहेत. आज शीजान खान याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाकडून शीजान खान याला दिलासा मिळालाच नाहीये.
आता यावर शीजान खान याने त्याच्या वकिलामार्फत एक अत्यंत मोठे विधान केले आहे. शीजान खान म्हणाला की, मला फक्त या केसमध्ये माझ्या धर्मामुळे अटक करण्यात आलीये. शीजान खान याचे वकिल शैलेंद्र मिश्रा यांनी मोठे दावे देखील केले आहेत.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर धर्माचे राजकारण सुरू झाले आहे. शीजान खान याच्या वकिलाने तुनिशा शर्मा हिच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत.
तुनिशाच्या आत्महत्येच्या १५ दिवस अगोदर शीजान आणि तुनिशाचे ब्रेकअप झाले होते आणि यामुळे तुनिशा तणावात असल्याने तिने आत्महत्या केल्याचे सुरूवातीपासून सांगितले जात आहे.
शीजान खान याच्या वकिलाने म्हटले आहे की, शीजान खान याच्या ब्रेकअपनंतर तुनिशा शर्मा ही अली नावाच्या एका मुलाच्या संपर्कात होती. अली आणि तुनिशाची मैत्री ही एका डेटिंग अॅपवर झाली होती.
इतकेच नाहीतर आत्महत्येच्या १५ मिनिटे अगोदर तुनिशा ही शीजान खान याला नाहीतर अली याला व्हिडीओ काॅलवर बोलली होती. इतकेच नाहीतर आपल्या आत्महत्येसंदर्भात तिने मालिकेमधील कलाकार पार्थ याला देखील सांगितले होते.
शीजान खान हा गेल्या २४ डिसेंबरपासून कोठडीमध्ये आहे. शीजान खान हा फक्त तुनिशा शर्मा हिच्याच संपर्कात नसून अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी शीजान खान याच्या कुटुंबियांनी एक पत्रकार परिषद घेत तुनिशा शर्मा हिच्या आईवर अनेक गंभीर आरोप केले होते. तुनिशा शर्माच्या वकिलाने देखील म्हटले आहे की, तुनिशा हिला चुकीची आैषधे शीजान खान याचे कुटुंबिय देत होते.