Tunisha Suicide Case | शीजान खान याचा पोलिस कोठडीमधील मुक्काम वाढला, तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरण भोवण्याची शक्यता

| Updated on: Dec 30, 2022 | 4:31 PM

न्यायालयाने सुरूवातीला शीजान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

Tunisha Suicide Case | शीजान खान याचा पोलिस कोठडीमधील मुक्काम वाढला, तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरण भोवण्याची शक्यता
Follow us on

मुंबई : तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिशा शर्मा हिने अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चा सुरू असतानाच तिच्या आईने अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेत तुनिशासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले. FIR नोंदवल्यानंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक करत न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने सुरूवातीला शीजान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

तुनिशा शर्मा प्रकरणात शीजान खानवर सतत होत असलेले गंभीर आरोप बघता न्यायालयाने 30 डिसेंबरपर्यंत पुन्हा कोठडीमध्ये वाढ केली. आज परत एकदा शीजान खान याला न्यायालयात हजर केले असता त्याला 31 डिसेंबरपर्यंत म्हणजेच अजून एक दिवस मुक्काम पोलिस कोठडीमध्ये वाढला आहे.

शीजान खान याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून यामध्ये पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाहीतर शीजान खान याची तुनिशासोबतच अजून एक सीक्रेट गर्लफ्रेंड देखील होती, पोलिस या सीक्रेट गर्लफ्रेंडची देखील चाैकशी करणार आहेत.

तुनिशा शर्मा हिच्या मामाने देखील मोठे आरोप करत हे सर्व लव्ह जिहाद असल्याचे म्हटले होते. कारण शीजान खान याच्यासोबतच त्याच्या कुटुंबियांनी देखील तुनिशा हिला तिच्या आईपासून दूर केले होते. पोलिसांना अजून एक दिवस शीजान खान याची चाैकशी करण्यासाठी मिळाला आहे.

तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर आता शीजान खान याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. कारण शीजानसोबतच त्याच्या कुटुंबियांची देखील पोलिसांनी चाैकशी केली आहे. अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये यानंतर तुनिशासोबतच शीजान खान देखील दिसणार नाहीये.