मुंबई : तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट पुढे आलीये. शीजान खान याचा पोलिस कोठडीमधील मुक्काम अजून काही दिवस वाढला आहे. तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर FIR दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक करत न्यायालयामध्ये हजर केले होते. न्यायालयाने शीजान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आता परत शीजान खान याच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आलीये.
24 डिसेंबरपासून शीजान खान याची चाैकशी पोलिस करत आहेत. परंतू शीजान खान हा पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे सांगितले जात आहे. आता शीजान खान याच्या या प्रकरणात अडचणी वाढल्या असून अजून काही दिवस त्याला पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
शीजानच्या कोठडीमध्ये वाढ करून 30 डिसेंबरपर्यंत त्याचा मुक्काम वाढला आहे. शीजान खान याचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांना काही महत्वाचे पुरावे सापडल्याचे सांगितले जात आहे.
शीजान खान हा फक्त तुनिशा शर्मा हिच्यासोबतच रिलेशनशिपमध्ये नसून तो इतरही मुलींच्या संपर्कात असल्याचे कळत आहे. तुनिशा शर्मा हिने अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेच्या सेटवर शीजान खान याच्या मेकअप रूमममध्ये आत्महत्या केली होती.
असे सांगितले जात आहे की, आत्महत्येच्या काही मिनिटे अगोदरच मेकअप रूममध्येच शीजान आणि तुनिशा यांच्यामध्ये कडाक्याची भांडणे झाली होती. शीजानसोबत ब्रेकअप झाल्याने तुनिशा हे तणावामध्ये देखील होती.