‘तुझ्या माझ्या संसाराला..’मध्ये देशमुखांच्या घरी दोन वेगळ्या चुली होणार?

| Updated on: Mar 08, 2022 | 5:54 PM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava) आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सिद्धार्थ अमेरिकेच्या हट्टापायी कुटुंबीयांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा बिलकुल विचार करत नाही. सिद्धूच्या हिस्सा मागण्याने आता देशमुखांच्या चुली वेगळ्या होणार अशी भिती बयो आजीला वाटते. पण अदिती त्यांना विश्वास देते की, […]

तुझ्या माझ्या संसाराला..मध्ये देशमुखांच्या घरी दोन वेगळ्या चुली होणार?
Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava
Image Credit source: Tv9
Follow us on

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava) आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सिद्धार्थ अमेरिकेच्या हट्टापायी कुटुंबीयांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा बिलकुल विचार करत नाही. सिद्धूच्या हिस्सा मागण्याने आता देशमुखांच्या चुली वेगळ्या होणार अशी भिती बयो आजीला वाटते. पण अदिती त्यांना विश्वास देते की, ती असं कधीही होऊ देणार नाही. तात्यांच्या निर्णयानुसार सगळे मिळून सिदला थोडी थोडी पैशांची मदत करायची ठरवतात, पण मिलिंदच्या सांगण्यावरुन सिद्धार्थ ती मदत नाकारतो आणि मला प्रॉपर्टीमधला हिस्साच हवा यावर अडून बसतो. शेवटी तात्या वकीलाला बोलावून फॅक्टरीच्या पदावरुन सिद्धार्थला बेदखल करतात आणि फॅक्टरीची मालकीण फक्त अदितीला बनवतात. (Hardeek Joshi)

सिद्धार्थ आता आदळआपट करुन नाही, तर प्रेमाने सगळ्यांना गंडवून हेतू साध्य करायचं ठरवतो. त्यासाठी, घरात पडेल ती नोकरासारखी सगळी कामं करायला सुरुवात करतो. अदितीला सिद्धार्थच्या प्रामाणिक प्रयत्नांविषयी विश्वास वाटू लागतो. सिद्धार्थला त्याची चूक कळेल का? त्याच्या अशा वागण्यामुळे देशमुखांच्या घरी दोन चुली होणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

झी मराठीवरील प्रेक्षकांची लोकप्रिय आणि कायम लक्षात राहील अशी व्यक्तिरेखा म्हणजे ‘राणा दा’. हा राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेत सिद्धार्थची भूमिका साकारतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. हार्दिकसोबतच अभिनेत्री अमृता पवार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचं कथानक आजच्या काळातील मुला-मुलींसाठी खूपच रिलेटेबल आहे. मी साकारत असलेली यातील भूमिका देखील खूप आपलीशी वाटणारी आहे. मी माझ्या वयाची आणि साधारण खऱ्या आयुष्यात मी जशी आहे तशी भूमिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर साकारतेय, त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय,” अशी प्रतिक्रिया अमृताने तिच्या भूमिकेविषयी दिली.

हेही वाचा:

यश देशमुख स्वत:च्या आईचं लग्न लावून देणार? ‘आई कुठे काय करते’ निर्णायकी वळणावर?

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत किर्तीचं आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न होणार पूर्ण