उर्फी जावेद हिच्या निशाण्यावर चित्रा वाघ, म्हणाली, भारतीय संस्कृतीचा अभ्यास…

| Updated on: Jan 14, 2023 | 9:57 PM

उर्फीने देखील चित्रा वाघ यांच्या विरोधात काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर आज पोलिसांनी चाैकशीसाठी उर्फीला बोलावले होते.

उर्फी जावेद हिच्या निशाण्यावर चित्रा वाघ, म्हणाली, भारतीय संस्कृतीचा अभ्यास...
Follow us on

मुंबई : उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या हटके कपड्यांमुळे टिकेचा सामना करावा लागतो. इतकेच नाहीतर यापूर्वी उर्फीला थेट कपड्यांमुळेच जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या आहेत. मात्र, असे असताना देखील उर्फीला काहीच फरक पडत नाही. मात्र, यावेळी उर्फी जावेद (Uorfi Javed) हिच्या हटके कपड्यांच्या विरोधात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या मैदानामध्ये उतरल्या आहेत. चित्रा वाघ यांनी अश्लीलता पसरवण्याचा आरोप उर्फी जावेद हिच्यावर करत थेट पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली होती. उर्फीने देखील चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या विरोधात काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर आज पोलिसांनी चाैकशीसाठी उर्फीला बोलावले होते.

यावेळी उर्फीने सांगितले की, भारतीय संविधानामध्ये कपडे घालण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र, जर लोक माझे फोटो काढत असतील तर त्याला मी काय करू शकते. इतकेच नाहीतर उर्फीने सोशल मीडियावर काही पोस्टही नुकताच शेअर केल्या आहेत.

उर्फी जावेद हिने एका ट्विटमध्ये फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, प्राचीन हिंदू महिला असे कपडे घालत असत… महिलांना स्वतःचे कपडे निवडण्याची मुभा त्यावेळी देखील होती. अगोदर जा आणि भारतीय संस्कृती जाणून घ्या…

यासोबतच उर्फीने अजून ट्विट करत म्हटले, मी तुम्हाला सांगते की, भारतीय संस्कृतीचा कोणता भाग नाहीये…डान्स, बार, बलात्कार आणि राजकिय लोक उघडपणे लोकांना त्यांच्या कपड्यांवरून मारण्याची धमकी देतात, हे भारतीय संस्कृतीचा भाग नाहीये .

आता उर्फी जावेद हिची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की, उर्फी जावेद जिथे भेटेल तिथे मी तिला चोपून काढणार आहे. आता हा वाद वाढताना दिसत आहे.

उर्फी जावेद ही तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी हिची सोशल मीडियावर फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. उर्फीच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स देखील भेटतात. मात्र, तिच्या कपड्यांमुळे तिला अनेकदा टार्गेट केले जाते.