मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिच्या कपड्यांमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, कोणी टिका करो किंवा पोलिस (Police) तक्रार उर्फी जावेद हिच्यावर काहीही परिणाम पडत नाही. उर्फी जावेद हिने तिच्या अतरंगी कपड्यांमुळे अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर (Social media) चांगलीच सक्रिय असते.
उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी उर्फी जावेद ही नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने गवताच्या खास ड्रेसवरील फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला.
नुकताच उर्फी जावेद हिने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्यावर टिका करण्यास सुरूवात केलीये. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय. व्हायरल होणारा उर्फी जावेद हिचा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसलाय.
उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने चक्क फुलाच्या हाराच्या मदतीने आपले शरीर झाकले आहे. इतकेच नाहीतर हातांनी देखील ती आपले शरीर झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत असून अनेकांनी तिला ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये.
उर्फी जावेद हिच्या व्हिडीओवर कमेंट कर एकाने म्हटले की, मुस्लिम नावावर तू कलंक आहेस. दुसऱ्याने लिहिले की, प्लीज रमजानमध्ये तरी असे काही करू नको, तिसऱ्याने लिहिले की, रमजान सुरू आहे थोडा तरी विचार कर…अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावले आहेत.
उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून लोक तिच्यावर भडकल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरने उर्फी जावेद हिला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.