मुंबई : उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद (Uorfi Javed) हिच्याविरोधात थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर उर्फी जावेद हिने देखील चित्रा वाघ यांच्याविरोधात काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. आजच मुंबई पोलिसांनी या तक्रारीनंतर उर्फी जावेद हिला चाैकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही देखील मोठे विधान केले होते. चित्रा वाघ यांनी थोबाड रंगवण्याची आणि जिथे भेटेल तिथे हाताखालून काढण्याची भाष्य उर्फी जावेद हिच्या विरोधात केली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उर्फी जावेद विरूध्द चित्रा वाघ असा सामना बघायला मिळतोय.
चित्रा वाघ यांनी तक्रार दाखल केल्यानंतर तर उर्फी जावेद हिने थेट भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. उर्फी जावेद हिच्या विरोधात चित्रा वाघ यांनी तक्रार करूनही उर्फीला काहीच फरक पडल्याचे दिसत नाहीये. अतरंगी कपडे घालणे उर्फीचे सुरूच आहे.
चित्रा वाघ यांच्यासोबत वाद सुरू असतानाच आता उर्फी जावेद हिच्या निशाण्यावर आध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव हे आहेत. उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या विरोधात काही पोस्ट शेअर केल्या आहेत.
Someone go actually teach him about nature ! pic.twitter.com/iLfsUoKNSZ
— Uorfi (@uorfi_) January 12, 2023
यामध्ये सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. इतकेच नाहीतर हा व्हिडीओ शेअर करताना उर्फीने म्हटले आहे की, छोट्या दिमागचा आहे….या व्हिडीओमध्ये सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी LGBTQ समुदायवर टिप्पनी केलेली दिसत आहे.
इतकेच नाहीतर पोस्ट शेअर करत उर्फी जावेद हिने चाहत्यांना म्हटले, सद्गुरु जग्गी वासुदेव यांना जे फाॅलो करतात, त्यांनी मला प्लीज अनफॉलो करावे. पोस्टमध्ये उर्फी जावेद हिने सद्गुरु जग्गी वासुदेव यांना खडेबोल सुनावले आहेत.
आता उर्फी जावेद हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फीला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून भेटली आहे. उर्फीने अनेक मालिकांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.