मुंबई : उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या नव्या आणि अतरंगी लूकमध्ये दिसते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये नक्कीच एक वेगळी आणि हटके ओळख निर्माण केलीये. अत्यंत कमी वेळामध्ये उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही सोशल मीडियावर (Social media) बघायला मिळते. गेल्या कित्येक वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम उर्फी जावेद ही करते. मात्र, म्हणावी तशी संधी ही उर्फी जावेद हिला मिळत नव्हती. शेवटी उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झाली आणि तिला एक खास ओळख मिळाली. बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमध्ये सहभागी झाल्यापासून परत कधीच उर्फी जावेद हिने मागे वळून बघितले नाही.
सोशल मीडियावर उर्फी जावेद हिला तब्बल 40 लाख लोक फाॅलो करतात. बरेच लोक उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका देखील करतात. मात्र, अशा टिकेचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. दररोज अतरंगी स्टाईलमध्ये उर्फी जावेद ही दिसते. सोशल मीडियावरही उर्फी जावेद कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
उर्फी जावेद हिला तिच्या अतरंगी स्टाईलमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट पोलिस ठाण्यात तक्रार उर्फी जावेद हिच्या विरोधात दिली होती. कपड्यांमुळे बऱ्याच वेळा उर्फी जावेद ही मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण बऱ्याचदा बघायला मिळते.
नुकताच उर्फी जावेद हिने तिच्या अतरंगी स्टाईलमध्ये नवे फोटोशूट केले आहे. या नव्या लूकचे तिने काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये उर्फी जावेद हिने पिंक रंगाचा आउटफिट घातल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा ड्रेस बॅकलेस आहे. या लूकचे वैशिष्ट तिचा ड्रेस नसून तिचा हेअरस्टाईल आहे.
या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा अंदाज अत्यंत बोल्ड दिसत आहे. उर्फीने या फोटोमध्ये केसांची हटके स्टाईल केलीये. उर्फी जावेद हिने केस बांधण्यासाठी छोट्या हँडबॅगचा वापर केला आहे. त्यामुळे तिचा लूकही चर्चेत आलायं. आता उर्फी जावेद हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत उर्फी जावेद कधी काय करेल याचा अजिबात नेम नसल्याचे म्हटले आहे.