Uorfi Javed | उर्फी जावेद आऊट ऑफ द बॉक्स, नवा लूक पाहा Video, कानात सुन्न होईल, जणू बंदुकीची गोळीच..

| Updated on: Apr 24, 2023 | 5:13 PM

उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर आल्यानंतर उर्फी जावेद हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये. विशेष म्हणजे उर्फी जावेद ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आता नव्या लूकमध्ये उर्फी जावेद ही दिसत आहे.

Uorfi Javed | उर्फी जावेद आऊट ऑफ द बॉक्स, नवा लूक पाहा Video, कानात सुन्न होईल, जणू बंदुकीची गोळीच..
Follow us on

मुंबई : उर्फी जावेद हे नाव कायमच चर्चेत राहते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने तिच्या अतरंगी कपड्यांमुळे अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. सोशल मीडियावरही उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही कायमच सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिची बऱ्याच वेळा इतकी जास्त अतरंगी स्टाईल असते की, सर्वांना धक्का बसतो. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांवरून खडेबोल सुनावले जातात. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्याविरोधात पोलिसांमध्ये धाव घेतली होती. इतकेच नाही तर जिथे भेटेल तिथे हाताखालून काढण्याची भाषा देखील केली होती. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या आहेत. मात्र, या धमक्यांचा उर्फी जावेद हिला काहीच फरक पडत नाही.

सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद हिच्या नव्या लूकचे काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिचा हा नवा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. उर्फी जावेद हिचे हे व्हिडीओ पाहून अरे बापरे हे नेमके काय आहे? असे सर्वजण म्हणताना दिसत आहेत. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिचा लूक पाहून तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय.

उर्फी जावेद हिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिने स्टाइलिश शॉर्ट ड्रेस घातला आहे. उर्फी जावेद हिचे स्कीन रंगाचे टॉप असून त्यावर दोन बंदूका दिसत आहेत. असे सांगितले जात आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर येत असलेल्या डिंपल कपाडियाच्या सास, बहू आैर फ्लेमिंगो या सीरिजमुळे उर्फी जावेद खूप प्रभावित झाली आणि तिने हा अशाप्रकारचा ड्रेस घातला आहे.

आता उर्फी जावेद हिच्या नव्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी आता यावरून उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये. एकाने लिहिले की, ही उर्फी जावेद कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये. दुसऱ्याने लिहिले की, आज ही बंदुका घालून फिरत आहे उद्या काय घालणार?