मुंबई : गेल्या काही वर्षांपासून बिग बाॅसच्या घराबाहेर एक वेगळे बिग बाॅस सुरू आहे. बिग बाॅसच्या सीजनला सुरूवात झाली की, बिग बाॅसच्या घरातील सदस्यांचे कुटुंबीय बाहेर बिग बाॅस बिग बाॅस खेळताना दिसतात. बिग बाॅसच्या घरात घडलेल्या एखाद्या घटनेविरूध्द व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला जातो. मग आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरू होते. घरात नेमके काय सुरू आहे हे माहिती नसताना देखील अनेकजण यावर प्रतिक्रिया देखील देतात.
सुंबुल ताैकीर खान हिच्या वडिलांनी आरोग्याचे खोटे कारण देत सुंबुलला बोलण्यासाठी बिग बाॅसला विनंती केली होती. परंतू यामध्ये त्यांनी आपल्या तब्येतीविषयी काहीच न बोलता थेट टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली.
हा सर्व प्रकार जेंव्हा टीव्हीवर दाखवण्यात आला. त्यानंतर बिग बाॅस आणि सुंबुलच्या वडिलांविरोधात लोकांनी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या.
Bigg Boss ne sunaayi poore ghar ko sazaa, kya Archana se ho jaayenge ab sab khafa??
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9.30 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot#BB16 #BiggBoss@beingsalmankhan@tresemmeindia @chingssecret @myglamm pic.twitter.com/TbCTKwEdkP
— Bigg Boss (@BiggBoss) November 27, 2022
बिग बाॅसने कालच्या एपिसोडमध्ये सुंबुलचे वडील, शालिन भनोटचे आई-वडील आणि टीना दत्ता हिची आई यांना बिग बाॅसच्या मंचावर आमंत्रित केले. यानंतर सुंबुलच्या वडिलांवर अनेक आरोप करण्यात आले.
हे सर्व बघितल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत असून बिग बाॅस विजेती उर्वशी ढोलकिया हिने प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये.
उर्वशीने म्हटले आहे की, मला आशा आहे की बिग बॉसमध्ये पालक-शिक्षकांची भेट पाहण्याची ही शेवटची वेळ असेल… जर असे हस्तक्षेप होत राहिले तर मला वाटते की या फॉरमॅटमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे वय 25 आणि त्याहून अधिक असावे.