मुंबई : बस्ती के हस्ती अर्थात एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चा विजेता झाला आहे. बिग बाॅस 16 हा सर्वात मोठा रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये स्पर्धेक म्हणून सहभागी होण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. मात्र, फार कमी लोकांना बिग बाॅसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. त्यापैकी मोजकेच लोक बिग बाॅसमध्ये सहभागी होऊन आपले नाव कमावतात. आतापर्यंत बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेकांचे नशीब उजळले आहे. बऱ्याच लोकांना थेट बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळालीये. त्यापैकी एक नाव म्हणजे शहनाज गिल हे देखील आहे. बिग बाॅसमध्ये ज्यावेळी शहनाज गिल ही सहभागी झाली होती, त्यावेळी तिला फक्त पंजाबमध्ये ओळखले जायचे. मात्र, आता तिला संपूर्ण देशभरात ओळखले जाते. बिग बाॅस 16 मध्ये एक खास मैत्री या सीजनमध्ये बघायला मिळाली. बिग बाॅसचे घर असे काही की इथे कोणतेही नात फार काळ टिकत नाही. परंतू साजिद खान (Sajid Khan), एमसी स्टॅन, शिव ठाकरे, अब्दु रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांची मैत्री शेवटपर्यंत टिकली.
एमसी स्टॅन बिग बाॅस 16 चा विजेता झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर बिग बाॅसच्या निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप सातत्याने केले जात आहेत. अनेकांनी थेट बिग बाॅसच्या शोला बायस्ड म्हणून टाकले आहे.
प्रियंका चाैधरी हिच्या चाहत्यांना तिच बिग बाॅसची विजेती होईल असे वाटतं होते. इतकेच नाही तर अनेकांना शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 चा विजेता होईल, असे वाटत होते. या दोघांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.
मुळात एमसी स्टॅन हा जरी घरामध्ये गेम खेळताना दिसला नसला तरीही त्याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. वोट जास्त पडल्यामुळे एमसी स्टॅन हा विजेता झालायं. मात्र, सोशल मीडियावर बिग बाॅस 16 च्या निर्मात्यांच्या विरोधात रोष वाढताना दिसत आहे.
एका युजर्सने लिहिले की, प्रियंका चाैधरी ही बाहेर पडल्यानंतर सलमान खान याला देखील खूप वाईट वाटले होते. सलमान खान हा देखील प्रियंका चाैधरी हिला बिग बाॅसच्या विजेता मानतो.
दुसऱ्याने लिहिले की, एमसी स्टॅन विजेता झाल्यामुळे शिव ठाकरे याच्यावर अन्याय झाला असून तोच खरा विजेता बिग बाॅस 16 चा आहे. शिव ठाकरे याने आपली मैत्री मनातून निभावली आहे.
दरवेळीच बिग बाॅसचा विजेता घोषित झाल्यानंतर अनेक लोक हे बिग बाॅसवर आरोप करतात. बिग बाॅस 16 हा टीआरपीमध्ये टाॅपला राहिला. घरातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले आहे.