मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने खास फोटोशूट केले होते. मात्र, फोटोमध्ये घातलेल्या कपड्यांमुळे तिच्या शरीरावर मोठी दुखापत देखील झाली. उर्फी जावेद हिच्या कपड्यांना तारेची डिझाईन असल्याने तिला दुखापत (Injury) झाली. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. मात्र, या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे वादात अडकते. काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरणे उर्फी जावेद हिला थेट बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली.
नुकताच सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील असून फॅशन डिजायनर अमित अग्रवाल यांच्या स्टोर ओपनिंगचा आहे. या कार्यक्रमात अनेक मोठ्या स्टारने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात उर्फी जावेद ही देखील सहभागी झाली होती.
या कार्यक्रमात जीनत अमान देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी जीनत अमान आणि उर्फी जावेद या सोबत दिसल्या. जीनत अमान यांना उर्फी जावेद ही काहीतरी बोलताना दिसत आहे. मात्र, जीनत अमान यांचे उर्फी जावेद हिच्या बोलण्यापेक्षा अधिक तिच्या कपड्यांवर नजर असून जीनत अमान या उर्फी जावेद हिच्याकडे रागात बघताना दिसत आहेत.
व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांनी थेट विचारले की, जीनत अमान या उर्फी जावेद हिच्याकडे इतक्या रागाने का बघत आहेत? इतकेच नाही तर व्हिडीओमध्ये जीनत अमान यांना उर्फी जावेद ही काहीतरी समजून सांगताना दिसत आहे. अनेकांनी तर थेट म्हटले की, जीनत अमान या उर्फी जावेद हिचा क्लास घेत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
जीनत अमान आणि उर्फी जावेद यांच्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. एकाने कमेंट करत म्हटले की, जीनत अमान या उर्फी जावेद हिची खरडपट्टी काढताना दिसत आहेत. दुसऱ्याने लिहिले की, या दोघी नेमके काय बोलते असतील? तिसऱ्याने लिहिले की, जीनत अमान यांचे उर्फी जावेद हिच्या बोलण्याकडे फार लक्ष नसून त्यांचे सर्व लक्ष हे उर्फी जावेद हिच्या कपड्यांकडे आहे.