रायपूर, दि. 23 नोव्हेंबर | बिग बी अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोड़पति’ हा शो नेहमीच चर्चेत असतो. परंतु यावेळी हा शो वेगळच ठरला. कारण अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सिटवर होता गुगुल बॉय. छत्तीसगडमधील भिलाई येथील विराट अय्यर हा गुगुल बॉय म्हणून ओळखला जातो. त्याचे वय फक्त आठ वर्ष आहे. आठ वर्षीय या विराटने विराट कोहलीसारखी विराट कामगिरी केली. पण शेवटच्या क्षणात तो कोंडीत पकडला गेला. एक कोटीच्या प्रश्नापर्यंत तो पोहचला. एकानंतर एक प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले. यामुळे एक कोटी जिंकण्याचा तो अंतिम टप्प्यात होता. परंतु त्याला एक कोटीसाठी खूप कठीण प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्याला विचारले. ‘क्या आप क्विट करना चाहेंगे’. त्यावर विराट याने म्हटले- ‘नहीं सर, थोड़ा सोचूंगा.’ पण विराट एक कोटी जिंकू शकला नाही.
अमिताभ बच्चन याने एक कोटीसाठी रसायनशास्त्रातील प्रश्न विचारला. अमिताभ बच्चन यांनी विचारले की ‘पीरियॉडिक टेबल में 96 और 109 परमाणु संख्या वाले दो तत्वों के नाम के बारे में क्या बात विशेष है?’ त्याला खालील पर्याय दिले होते.
विराट या प्रश्नावर अडचणीत आला. तो A किंवा B च्या संभ्रमात होता. खूप वेळ विचार केल्यावर त्याने A उत्तर लॉक केले. परंतु हे उत्तर चुकीचे होते. या प्रश्नांचे बरोबर उत्तर B होते. यामुळे विराटला एक कोटी ऐवजी 3 लाख 20 हजार रुपये मिळाले. या शोचे प्रसारण २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी झाले. परंतु या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन त्या मुलाचे फॅन झाले. विराट फक्त तिसरी आहे.