मुंबई : बिग बॉस 16 मध्ये मोठे ट्विस्ट येणार आहे. बिग बाॅसच्या निर्मात्यांनी टीआरपी वाढवण्यासाठी मोठा गेम खेळला आहे. विशेष म्हणजे खरोखरच याचा फायदा आता बिग बाॅसच्या निर्मात्यांना होताना दिसत आहे. बिग बाॅस 15 ज्याप्रकारे टीआरपीमध्ये फेल गेले. तशी एकही चुक यावेळी निर्मात्यांना करायची नसल्याचे दिसत आहे. टीआरपी वाढवण्यासाठी बिग बाॅसच्या निर्मात्यांनी या सीजनला सुरूवातीपासूनच कंबर कसली आहे. प्रेक्षकांना शोसोबत जोडून ठेवण्यासाठी निर्माते शोमध्ये वेगवेगळे ट्विस्ट आणत आहेत.
आता बिग बाॅसच्या घरात वाइल्डकार्ड म्हणून दोन जणांची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नाव प्रचंड चर्चेतील असून यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता आहे.
शोचे पहिले वाइल्डकार्ड म्हणून लोकप्रिय ‘गोल्डन बॉईज’ म्हणजेच सनी नानासाहेब वाघचोरे आणि संजय गुजर बिग बाॅसमध्ये एन्ट्री घेणार आहेत. हे दोघेही त्यांच्या अंगावर असलेल्या सोन्यामुळे कायमच चर्चेत असतात.
गोल्डन बॉईजच्या आगमनानंतर बिग बॉसमध्ये एक नवा आणि मनोरंजक ट्विस्ट येणार आहे. चॅनल कलर्सने याचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
कलर्स टीव्हीने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. या दोघांच्या बिग बाॅसमधील एन्ट्रीमुळे नक्कीच टीआरपी वाढवण्यामध्ये मदत होईल, अशी एक चर्चा आहे.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, गोल्डन बॉईजच्या एन्ट्रीमुळे घरातील सदस्य देखील खुश आहेत. इतकेच नाही तर घरातील सदस्य त्यांना अनेक प्रश्न विचारताना देखील दिसत आहेत.
गोल्डन बॉईज बिग बाॅसच्या घरात आल्याने एमसीची पावर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण गोल्डन बॉईज देखील पुण्याचेच आहेत आणि ते एमसीचे खूप चांगले मित्र आहेत.