Uorfi Javed | उर्फी जावेद हिच्या कपड्यांविरोधात महिलांनी काढला मोर्चा, थेट रस्त्यावर येत केली मोठी मागणी

| Updated on: May 16, 2023 | 2:32 PM

उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच वादात सापडते. उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर नेहमीच टिका केली जाते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिच्या कपड्यांविरोधात महिलांनी काढला मोर्चा, थेट रस्त्यावर येत केली मोठी मागणी
Follow us on

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अगदी कमी कालावधीमध्ये खास ओळख नक्कीच मिळवली आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही (Fan following) बघायला मिळते. मात्र, आपल्या कपड्यांमुळे उर्फी जावेदला बऱ्याच वेळा टिकेचा सामना हा करावा लागतो. उर्फी जावेद हिला आतापर्यंत अनेकदा तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिला जिथे मिळेल तिथे हाताखालून काढण्याची भाषा केली होती. उर्फी जावेद ही देखील चित्रा यांना जोरदार प्रतिउत्तर (Reply) देताना दिसली. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे.

उर्फी जावेद हिने टीव्ही मालिकांपासून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमध्येच मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सतत उर्फी जावेद हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावरही उर्फी जावेद ही सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादात अडकते. आता तर चक्क उर्फी जावेद हिच्या विरोधात काही महिला या रस्त्यावर आल्या आहेत. उर्फी जावेद हिच्या विरोधात महिलांनी मोर्चा काढला आहे. फक्त मोर्चाच नाही तर या महिलांनी उर्फी जावेद हिला खास कपडे देखील पाठवले आहे. आता यावर उर्फी जावेद ही काय दणदणीत उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

इंदूरमधील महिलांनी उर्फी जावेद हिच्या विरोध काढलेल्या मोर्चामध्ये हातामध्ये काही पोस्टर देखील घेतले होते. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले की, नग्नता प्रकार योग्य आहे का? आता उर्फी जावेद हिच्या विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. या मोर्चाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनेकांनी या मोर्चाचा सपोर्ट देखील केलाय.

उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वी शर्ट न घातला एक फोटोशूट केले होते. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत होता. उर्फी जावेद हिने या व्हिडीओमध्ये शर्ट न घातला हातामध्ये नाश्त्याच्या प्लेट घेतल्याचे स्पष्ट दिसत होते. रमजानच्या दिवशी उर्फी जावेद हिने बिकिनीवरील काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामुळे अनेकांनी तिच्यावर टिका केली.