यश देशमुख स्वत:च्या आईचं लग्न लावून देणार? ‘आई कुठे काय करते’ निर्णायकी वळणावर?

| Updated on: Mar 08, 2022 | 3:40 PM

एकीकडे अरुंधतीचं (Arundhati) एकटं राहणं अभिषेकला खुपतंय, तर दुसरीकडे यश मात्र आईच्या या निर्णयाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक सध्या निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

यश देशमुख स्वत:च्या आईचं लग्न लावून देणार? आई कुठे काय करते निर्णायकी वळणावर?
Yash and Arundhati
Image Credit source: Hotstar
Follow us on

एकीकडे अरुंधतीचं (Arundhati) एकटं राहणं अभिषेकला खुपतंय, तर दुसरीकडे यश मात्र आईच्या या निर्णयाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक सध्या निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आई स्वत:चा विचार करू शकत नाही, या मताचा असलेला अभिषेक अरुंधतीला बरंवाईट सुनावतो. यावेळी अनघा आणि आशुतोषसुद्धा त्याच्यासमोर असतात. अभिषेकचे बेताल बोल ऐकून संयम सुटलेली अरुंधती त्याच्या कानशिलात लगावते. तर संतापलेला आशुतोष हा देशमुखांच्या घरी जाऊन अनिरुद्धला चार शब्द सुनावतो. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे यशच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू आहेत. अरुंधती आणि आशुतोष या दोघांनी एकत्र यावं, अशी त्याची मनोमन इच्छा आहे. हीच इच्छा तो गौरीला बोलून दाखवतो. (Star Pravah Serial)

“४५व्या वर्षीही बाई तिचं नवं आयुष्य सुरू करू शकते”

अरुंधती जरी एकटी राहू लागली तरी तिला एकटेपणाची सवय नाही, याविषयी यश आणि गौरी बोलत असतात. तेव्हाच यश त्याच्या मनातलं बोलू लागतो. “आईला एकटं वाटू नये, त्रास होऊ नये म्हणून आपण तिच्यासोबत राहत जाऊ. पण शेवटी हे सगळं टेम्पररी झालं ना. आपण तिच्यासोबत कायम राहू. पण शेवटी आपल्याला आपली कामं आहेत, आपलंही एक लाइफ असेलच ना. म्हणजे आपण कायम तिच्यासोबत थोडा थोडा वेळ घालवणार, पण उरलेला वेळ ती एकटीच असेल ना. तिलाही कोणी तिच्या हक्काचं, तिची काळजी घेणारं मिळालं तर काय हरकत आहे. आशुतोष सर आईशी किती छान वागतात. त्यांना आईचं किती कौतुक आहे. आशुतोष आणि आई एकत्र आले तर काय हरकत आहे? पूर्वी त्यांना आईबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. तो अजूनही असेल का? ते ही एकटे आहेत आणि आईसुद्धा एकटीच आहे. दोघांनी जर एकमेकांचा एकटेपणा घालवला तर कोणाला काय प्रॉब्लेम असू शकतो,” असा प्रश्न तो गौरीसमोर मांडतो. यावर गौरी अरुंधतीची बाजू यशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते.

“कायमचं एकटं राहणं कठीण आहे आणि अनफेअरही आहे. लोक काय म्हणतील, याचा विचार तिला येऊ नये. ४५व्या वर्षीही बाई तिचं नवं आयुष्य सुरू करू शकते, तिचा जोडीदार निवडू शकते,” असं तो स्पष्टपणे गौरीला म्हणतो. गौरीसुद्धा त्याच्या या मताशी सहमत असते. त्यामुळे यश खरंच आशुतोष आणि अरुंधतीला एकत्र आणेल का, आशुतोषने प्रेमाची कबुली दिल्यानंतर अरुंधतीची काय प्रतिक्रिया असेल, आशुतोष आणि अरुंधती यांच्यातील जवळीक आणखी वाढेल की कायमचा दुरावा येईल, हे मालिकेच्या आगामी भागातून स्पष्ट होईल.

आशुतोषने देशमुख कुटुंबीयांसमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर यश पुन्हा अरुंधतीकडे तिचे विचार जाणून घेण्यासाठी येतो. तुझ्या मनात नक्की फक्त मैत्री आहे का, असा प्रश्न तो तिला विचारतो. त्यावर अरुंधती म्हणते, “आशुतोषमुळे मला हवं तसं वागू-बोलू देणारा माणूस भेटला. यांच्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटतंय.” हे ऐकल्यानंतर यश त्यांच्यासाठी काही करेल का, त्यांना एकत्र आणण्याचं काम तो करेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.

हेही वाचा:

लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?