Vaishali Takkar Death : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री वैशाली ठक्करने (Vaishali Takkar Death) मध्यप्रदेशातील इंदौर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या पाच दिवसांपूर्वी वैशाली सोशल मीडियावर (social media) ॲक्टिव्ह होती. अत्यंत प्रसन्न मुद्रेत तिने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केला होता. या रीलमध्ये तिने एक गाणंही म्हटलं होतं. तिचा हा फनी व्हिडीओ तिच्या चाहत्यांनाही खूप आवडला होता. त्यावर तिच्या फॅन्सनी मजेदार कमेंटही केल्या होत्या. मात्र, आज ती आपल्यात (suicide) नाही हे ऐकून तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.
आत्महत्या करण्याच्या पाच दिवसांपूर्वी वैशाली सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती. तिनेच इन्स्टाग्रामवर एक रील व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर लोकांनी प्रतिक्रियाही व्यक्त केली होती. आता तिच्या मृत्यूनंतर हा व्हिडीओ वेगाने शेअर होत आहे.
वैशालीने या शेवटच्या व्हिडीओत लिप सिंक केले होते. यावेळी तिने बेबी मैं तुम्हारे लिए एक गाना गाऊ, असं म्हटलं होतं. त्यानंतर तिने, दिल-जिगर नजर क्या है, मैं तो तेरे लिए जान भी दे दूं हे गाणं म्हटलं होतं.
वैशाली ठक्करचं आयुष्य एकदम नॉर्मल सुरू होतं. मग अचानक तिने आत्महत्या का केली? असा सवाल केला जात आहे. पोलिसांना तिचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेला मिळाला. तिच्या मृतदेहासोबत एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलीस या सुसाईड नोटवरून पुढचा तपास करत आहे.
वैशाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये कामं केली होती. सुसराल सिमर का मध्येही ती होती. या मालिकेत तिने अंजली भारद्वाज ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. या शिवाय सुपर सिस्टर, मोहिनी सीजन-2 मध्येही ती होती.