मुंबई : ‘झी मराठी अवॉर्ड्स 2021’ (Zee Marathi Awards 2021 ) नुकतेच झी मराठीवर 30 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसारित झाले आहेत. बऱ्याच दिवसांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांना अखेर हा पुरस्कार सोहळा मराठी टेलिव्हिजनवर पाहायला मिळाला. या कार्यक्रमाचे शूटिंग ‘सा रे ग म प लिल चॅम्प्स’च्या सेटवर झाले. या पुरस्कार सोहळ्याला केवळ मराठी स्टार्सच नाही तर गोविंदा, कतरिना कैफ, रोहित शेट्टी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
या सोहळ्याचे शूटिंग मुंबईत झाल्यापासून चाहत्यांना जाणून घ्यायचे होते की, यावेळी विजेते कोण आहेत. त्यामुळे विजेत्यांच्या यादीची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत संपूर्ण विजेत्यांची यादी, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की, कोणत्या क्षेत्रात कोणाला पुरस्कार मिळाला आहे. तसे, यावेळी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिका खूप गाजल्या आहेत. या मालिकांनी अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.
सर्वोत्कृष्ट मालिका (Best Show) : माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Aactor) : यश (माझी तुझी रेशीमगाठ)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress) : नेहा (माझी तुझी रेशीमगाठ)
सर्वोत्कृष्ट खलनायक : अण्णा नाईक
सर्वोत्कृष्ट खलनायक (महिला) : मालविका
सर्वोत्कृष्ट जोडी : दीपू आणि इंद्र
सर्वोत्कृष्ट पात्र (पुरुष) : समीर
सर्वोत्कृष्ट पात्र (स्त्री) : बंडू काकू
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : मोठ्या बाई
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : सयाजी
सर्वोत्कृष्ट कुटुंब : देशमुख
सर्वोत्कृष्ट वडील : देशपांडे सर
सर्वोत्कृष्ट आई: नेहा
सर्वोत्कृष्ट सून : स्वीटू
सर्वोत्कृष्ट सासरे : दादा साळवी
सर्वोत्कृष्ट सासू: शकू
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता (पुरुष): समीर
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : शेफाली
सर्वोत्कृष्ट टायटल सॉन्ग (Best Title Song): माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : परी
सर्वोत्कृष्ट आजोबा: जगन्नाथ चौधरी
सर्वोत्कृष्ट आजी: बयो बाई
सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन शो (Best Non Fiction Show) : चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट निवेदक : मृण्मयी देशपांडे
जीवनगौरव पुरस्कार: मोहन जोशी
Happy Birthday Shah Rukh Khan | ‘किंग खान’ शाहरुखला का मिळाली ‘बादशाह’ ही ओळख? तुम्हाला माहितीये का?