मुंबई : झी मराठीवरील ‘मन उडु उडु झालं’ (Mann Udu Udu Zaal) या मालिकेतील ‘सत्तू’ या व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांचं विशेष प्रेम आहे कारण ही व्यक्तिरेखा त्यांना हसायला भाग पाडते. सत्तूची भूमिका साकारणारा अभिनेता विनम्र भाबळ (Actor Vinamra Bhabal) याला देखील सत्तू प्रमाणे हसायला आणि आनंदी जगायला आवडते, तो स्वतः देखील या भूमिकेच्या प्रेमात आहे. या भूमिकेबद्दल विनम्र सोबत साधलेला हा खास संवाद…
– सत्तू खूप निरागस आहे. खूप खरा माणूस आहे. मग तो मित्र म्हणून असेल किंवा मग त्याच दिपूवरच प्रेम असेल. इंद्रा त्याच्यासाठी सर्वस्व आहे. त्याच्या आयुष्यात तसं बघायला गेलं तर, इंद्रा सोडून दुसरं काही नाहीये. त्यामुळे त्याची दुनिया इंद्रा भोवती फिरते.
– कमाल प्रतिसाद मिळतोय. म्हणजे मी रस्त्यावर असताना मास्क खाली केला की, लोकं नक्की ओळखतातचं! शिवाय मास्कमध्ये असलो तरी सुद्धा ओळखतात. खूप काळानंतर लोकांचं हे असं प्रेम अनुभवतो आहे.
– तसं खूप साम्य आहे असं मला वाटत नाही. सत्तू जेवढा निरागस आहे, तेवढा मी नक्कीच नाहीये. सत्तूसाठी मैत्री ही गोष्ट जिवापेक्षा महत्त्वाची आहे. तसं माझ्यासाठी नाहीये. मी स्वतःसाठी जगणारा माणूस आहे. खाण्याच्या बाबतीत थोड साम्य आहे. कारण मी खऱ्या आयुष्यातसुद्धा खूप फुडी आहे. मला खूप वेगवेगळं खाणं ट्राय करायचं असतं. सत्तूसारखं मला हसायला, खूप आनंदी जगायला आवडतं.
– फेसबूकवर “वाचनवेडा (पुस्तकं वाचण्याऱ्या प्रत्येकाचा ग्रुप)” असा ग्रुप मी चालवतो. त्यावर 3 लाखांहून जास्त लोक आहेत सद्ध्या 2.5 लाख लोक दररोज कार्यरत असतात. वाचनवेडावर लोकं आपलं पुस्तकवाचन, पुस्तकसंग्रह, वाचनवेड एकमेकांना सांगतात. त्यामुळे माझ्यासारख्या नवीन लोकांना नवनवीन पुस्तकांची, मासिकांची, अंकांची अशी एकूण साहित्यविश्वाची माहिती मिळते आणि वाचन समृद्ध व्हायला मदतही होते.
– मी मुळात मी खूप काम केलं नाहीये आणि तसा काही व्यस्त ही नसतो. त्यामुळे वाचनाला खूप वेळ मिळतो. आता मालिका सुरू झाल्यामुळे थोडा कमी वेळ देता येतोय, पण ज्या दिवशी मला खूप ताण नसेल कामाचा तेव्हा दोन शॉटच्यामध्ये मी माझं वाचन सुरू ठेवतो. सेटवर तसंच माझ्या एकूण आयुष्यात सुद्धा एक-दोन पुस्तकं सतत सोबत ठेवतो. त्यामुळे जरा वेळ मिळाला की, लगेच वाचन सुरू करतो. यामुळे मला सोशल मीडियावर उगाच टाईमपास करायला वेळ मिळत नाही. कामापुरत राहतो कारण काळाची गरज आहे.
– वाचनाचा सर्वांगाने फायदा होतो. मुळात वाचनाने मला ऐकायला शिकवलं. मी घरी असलो की, दररोज किमान 15 मिनिटं मोठ्याने वाचतो. मी काय वाचतो हे माझं मीच ऐकतो. त्यामुळे समोर कुणी असायला हवं असं ही नाहीये. एखादी गोष्ट किंवा काही ओळी आवडल्या की, आईला वाचून दाखवतो म्हणजे तिच्या हावभावावरून मला माझं वाचन समोरच्यापर्यंत किती पोहोचत आहे, हे सुद्धा कळतं. वाचन तुम्हाला अभिनयासाठीच्या सुराची जाण पक्की करत. वाणी शुद्ध करतं, सोबत तुमची शब्दसंपदा ही वाढवतं. मला वाचनाचा अभिनयात अजून एक मोलाचा फायदा झालाय. इथे येण्यासाठीचे मार्ग मला वाचनातून सापडले. रंगभूमी कळली आणि तिचं कलाकाराच्या आयुष्यातलं योगदान इतर कलाकारांच्या आत्मचरित्रातून कळलं. त्यामुळे मी आधीपासून योग्य व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून सुरुवात केली.
’बाबू’मध्ये पाहायला मिळणार ॲक्शनचा तडका, हटके लूकमध्ये दिसणार अंकित मोहन!