झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध कोरियोग्राफरने संपवलं स्वतःचं आयुष्य; शेवटच्या व्हिडीओमध्ये सांगितलं कारण

| Updated on: May 01, 2023 | 5:05 PM

प्रसिद्ध कोरियोग्राफरच्या निधनाचं कारण समजताच तुम्हालाही बसेल मोठा धक्का; शेवटच्या व्हिडीओमध्ये सांगितलं का संपवलं स्वतःला? कुटुंबावर दुखाःचा डोंगर

झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध कोरियोग्राफरने संपवलं स्वतःचं आयुष्य; शेवटच्या व्हिडीओमध्ये सांगितलं कारण
Follow us on

मुंबई : झगमगत्या विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. ज्यामुळे सेलिब्रिटींच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी एका फॅशन डिझायरने स्वतःचे आयुष्य संपवलं होतं. ही घटना ताजी असताना दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध कोरियोग्राफरने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वातील या कोरियोग्राफरचं नाव चैतन्य (Choreographer Chaitanya Suicide) असं आहे. महत्त्वाचं म्हणजे चैतन्य याच्या निधनाचं कारण देखील समोर आलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र चैतन्य (Choreographer Chaitanya Suicide) याच्या निधनाची चर्चा सुरू आहे.

चैतन्य आर्थिक संकटांचा सामना करत होता आणि अनेक महिन्यांपासून कर्जाची परतफेड करू शकत नव्हता, म्हणून त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्याच येत आहे. चैतन्य याने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून आपली व्यथा मांडली आहे. स्वतःवर असलेल्या कर्जाबद्दल देखील अभिनेत्याने सांगितलं आहे. अशात कुटुंबीयांची माफी मागताना त्याने आपल्याला किती अडचणींचा सामना करावा लागला हे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

आंद्र प्रदेश येथील नेल्लोर येथील राहणारा चैतन्य गेल्या काही दिवसांपासून कर्ज बाजारी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य याने ३० एप्रिल रोजी स्वतःला संपवलं आहे. निधनापूर्वी चैतन्य याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्याने धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र चैतन्य आणि त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची चर्चा रंगत आहे.

रिपोर्टनुसार, ‘माझे आई – वडील आणि बहिणीने माझी काळजी घेतली. त्यांनी मला कधीच कोणत्याच गोष्टीची त्रास होवू दिला नाही. मी माझ्या मित्रांची माफी मागतो. मी अनेकांना त्रास दिला आहे. पैशांच्या बाबतीत मी माझा चांगूलपणा गमावला आहे. लोकांकडून फक्त कर्ज घ्यायचा नसतं, तर ते फेडण्याची क्षमता देखील असायला हवी…’

पुढे चैतन्य म्हणाला, ‘मी सध्या नेल्लोर याठिकाणी आहे आणि आजचा माझा शेवटचा दिवस आहे. कर्जासंबंधी त्रास मी आता सहन करु शकत नाही…’ असं देखील कोरियोग्राफरचं चैतन्य म्हणाला. चैतन्य याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर कोरियोग्राफर चैतन्य याच्या निधनानंतर कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.