मुंबई : शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असते. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवलाय. शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शिल्पा शेट्टी आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. शिल्पा शेट्टी ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी व्यायामाचे आणि तिच्या डाएटचे फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर करते. शिल्पा शेट्टी ही आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते.
मध्यंतरी चर्चा होती की, शिल्पा शेट्टी हिचा पती बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होईल. बिग बाॅस 17 मध्ये राज कुंद्रा हा काही खुलासे करण्याची शक्यता होती. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. फक्त आरोपच नाही तर थेट राज कुंद्रा याला जेलमध्ये राहण्याची थेट वेळ आली.
राज कुंद्रा याला पाॅर्न किंग म्हटले गेले. राज कुंद्रा याचा आता UT 69 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे या चित्रपटातून राज कुंद्रा हा मोठे खुलासे करणार आहे. 69 दिवस जेलमध्ये कसे गेले आणि त्याच्यासोबत नेमके काय काय घडले याबद्दल राज कुंद्रा हा खुलासे या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहे.
Farewell Masks …it’s time to separate now! Thank you for keeping me protected over the last two years. Onto the next phase of my journey #UT69 🙏🎭🥹 🧿😇❤️ pic.twitter.com/svhiGS8aHt
— Raj Kundra (@onlyrajkundra) October 20, 2023
राज कुंद्रा हा त्याच्या एका पोस्टमुळे तूफान चर्चेत आला. यामध्ये तो थेट म्हणाला होता की, आम्ही वेगळे झालो आहोत, असे त्याने म्हटले. यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर लोकांना वाटले की, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हेच विभक्त झाले. मात्र, आता यासंदर्भात अत्यंत मोठा खुलासा झालाय.
राज कुंद्रा हे शिल्पा शेट्टी हिच्यासाठी नाही तर थेट त्याच्या चेहऱ्याच्या मास्कसाठी बोलत असल्याचे पुढे आले. गेल्या दोन वर्षांपासून राज कुंद्रा हा मास्क घालूनच बाहेर फिरताना दिसतो. आम्ही वेगळे झालो हे राज कुंद्रा त्याच्या मास्कबद्दल बोलत होता. नुकताच राज कुंद्रा याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातूनच हा खुलासा करण्यात आला.