Video | आमिर खान याला पाहून लोक हैराण, अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

| Updated on: Oct 05, 2023 | 4:12 PM

आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. परिणामी चित्रपट फ्लाॅप गेला.

Video | आमिर खान याला पाहून लोक हैराण, अभिनेत्याचा तो व्हिडीओ तूफान व्हायरल
Follow us on

मुंबई : आमिर खान हा नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. आमिर खान (Aamir Khan) याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आमिर खान याने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. आमिर खान याचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट अत्यंत मोठ्या बजेटचा चित्रपट. मात्र, तरीही चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेलाय.

लाल सिंह चड्ढा चित्रपटाकडून आमिर खान याला मोठ्या अपेक्षा होत्या. चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान याने जाहिर केले की, सतत चित्रपट करत असल्याने काही वर्षांपासून तो कुटुबियांना अजिबात वेळ देऊ शकला नाहीये. यामुळे पुढील काही दिवस तो फक्त आणि फक्त कुटुंबियांना वेळ देणार आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.

आमिर खान हा जरी मोठ्या पडद्यापासून दूर असला तरीही तो कायमच चर्चेत असतो. नुकताच आता आमिर खान हा एका बर्थडे पार्टीमध्ये पोहचला. यावेळी आमिर खान याचा लूक जबरदस्त असा दिसला. आमिर खान याला पाहून अनेक चर्चांना उधाण आले. इतकेच नाही तर आमिर खान याचा हा नवा लूक त्याच्या चाहत्यांना आवडलाय.

आमिर खान याची नवीन ही हेअरस्टाईल त्याच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. आता आमिर खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. आमिर खान याच्या घरी काही दिवसांपूर्वी सलमान खान हा पोहचला. यावेळी सलमान खान हा आमिर खान याच्या कुटुंबियांसोबत फोटो काढताना दिसला.

आमिर खान याची लेक इरा खान ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. इरा खान हिचा साखरपुडा मुंबईत पार पडलाय. इरा खान ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिचा होणारा पती नुपूर शिखरे याच्यासोबत खास वेळ घालवताना इरा खान ही दिसली. आता आमिर खान या आमागी चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येतो याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत.