मुंबई : मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शाहरूख खान याची लेक सुहाना खान, करीना कपूर खान, कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अर्जुन कपूर हे पोहचले. या कार्यक्रमामध्ये होस्ट करताना अर्जुन कपूर हा दिसला. विशेष म्हणजे सुहाना खान, करीना कपूर खान, कियारा अडवाणी यावेळी जबरदस्त लूकमध्ये दिसत होत्या. मुळात म्हणजे शाहरूख खान याची लेक सुहाना खान (Suhana Khan) हिचा चित्रपट यंदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने सुहाना तूफान चर्चेत दिसत आहे. सुहाना ही वडील शाहरूख खान यांच्यासोबतही लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसेल.
काही दिवसांपूर्वीच कियारा अडवाणी हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटामध्ये कियारा अडवाणी हिच्यासोबत कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिके होता. कार्तिक आणि कियाराची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडल्याचे दिसले. सत्यप्रेम की कथा हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने मोठी धमाल केली. कार्तिक आर्यन याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून आपल्या जलवा दाखवताना दिसत आहेत.
सुहाना खान, करीना कपूर खान, कियारा अडवाणी आणि अर्जुन कपूर हे ज्या कार्यक्रमात पोहचले, तेथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कियारा अडवाणी हिच्यासोबत असे काही घडले की, ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. अर्जुन कपूर हा कियारा अडवाणी हिच्या मदतीला धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.
कियारा अडवाणी हे स्टेजवर अर्जुन कपूर याला भेटल्यानंतर आपल्या जागेवर बसण्यासाठी वापस येत असताना थेट तिचा पाय कपड्यांमध्ये अडकला आणि ती पडता पडता वाचली. त्यानंतर अर्जुन कपूर हा लगेचच तिचा हात पकडताना देखील दिसतोय. कियारा अडवाणी थेट करीना कपूर खान हिच्याच अंगावर सरळ पडणार होती.
विशेष म्हणजे लगेचच स्वत:ला सांभाळत कियारा अडवाणी हिने आपण ठिक असल्याचे सांगितले. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होचाना दिसत आहे. कियारा अडवाणी हिचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते हे चांगलेच टेन्शनमध्ये आल्याचे बघायला मिळाले. कियारा अडवाणी हिला दुखापत झाल्याचे देखील सांगितले जात आहे.
या व्हिडीओवर कमेंट करत लोक कियारा अडवाणी हिला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. कियारा अडवाणी हिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कियारा अडवाणी ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामध्ये बिझी आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.