ती आली, प्रभाससोबत फोटो काढला अन् चापटी मारून गेली; सुपरस्टारबाबत असं का घडलं?

| Updated on: Dec 31, 2023 | 8:12 PM

प्रभास हा नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. प्रभास याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्रभास याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या.

ती आली, प्रभाससोबत फोटो काढला अन् चापटी मारून गेली; सुपरस्टारबाबत असं का घडलं?
Follow us on

मुंबई : साऊथ स्टार प्रभास (Prabhas) हा नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता आहे. प्रभास याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच प्रभास याचा आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना प्रभास दिसला. विशेष म्हणजे आदिपुरुष हा चित्रपट (Movie) अत्यंत बिग बजेटचा चित्रपट ठरलाय. आदिपुरुष चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

मुळात म्हणजे आदिपुरुष हा चित्रपट रिलीजच्या अगोदरच मोठ्या वादात सापडला. आदिपुरुष चित्रपटात प्रभास याच्यासोबत क्रिती सनॉन ही मुख्य भूमिकेत दिसली. प्रभास हा भगवान राम यांच्या भूमिकेत. क्रिती सनॉन ही माता सीतेच्या भूमिकेत. सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत दिसला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले.

शेवटपर्यंत चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. प्रभास याचा आदिपुरुष हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. क्रिती सनॉन आणि प्रभास हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरच यांचे अफेअर सुरू झाल्याचे सांगितले गेले. क्रिती सनॉन आणि प्रभास यांचा साखरपुडा हा लवकरच पार पडणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

सध्या प्रभास याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. प्रभास याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. मुळात म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला प्रभासचा हा व्हिडीओ जुना आहे. मात्र, तो सध्या चर्चेचा विषय ठरलाय. प्रभास याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

प्रभास हा विमानतळावरून जात असतानाच एक मुलीने प्रभास याला ओळखले. यावेळी तिने प्रभासला फोटो काढण्यासाठी विनंती केली. यानंतर प्रभास हा थांबला देखील. ही मुली अगोदर प्रभास याच्यासोबत फोटो काढते आणि तिला इतका जास्त आनंद होतो की, फोटो काढल्यानंतर ती चक्क जोरजोरात उड्या मारताना दिसते.

ही मुलगी उड्या मारत ओरडते देखील. यानंतर उत्साहाच्या भरात ही मुलगी प्रभास याच्या गालावर मारते. या मुलीचे हे कृत्य पाहून उपस्थित लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. इतकेच नाही तर प्रभास याने देखील आपल्या चेहऱ्याला हात लावल्याचे बघायला मिळतंय. लोक या व्हिडीओनंतर या मुलीला खडेबोल सुनावताना देखील दिसत आहेत.