मुंबई : हरियाणाची फेमस डान्सर सपना चाैधरी ही कायमच चर्चेत असते. सपना चाैधरी (Sapna Choudhary) हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सपना चाैधरी हिच्या शोला प्रेक्षकांची उदंड अशी गर्दी ही बघायला मिळते. फक्त हरियाणामध्येच नाही तर काही दिवसांपूर्वी बीड (Beed) जिल्हातील परळीमध्येही सपना चाैधरी हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परळीमध्येही सपना चाैधरी हिच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी ही बघायला मिळाली. फक्त हरियाणाच नाही तर संपूर्ण देशभरात सपना चाैधरी हिचे नाव आहे. सपना चाैधरी ही बिग बाॅसमध्येही (Bigg Boss) सहभागी झाली होती.
सध्या सपना चाैधरी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सपना चाैधरी हिचा हा व्हिडीओ जुना आहे. मात्र, सध्या तो तूफान व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सपना चाैधरी ही तिच्या डान्समुळे खूप जास्त फेमस आहे. अत्यंत कमी वयामध्येच सपना चाैधरी हिने डान्स करण्यास सुरूवात केली.
सपना चाैधरी हिचा जो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे, त्या व्हिडीओमध्ये सपना चाैधरी ही खुर्चीवर बसलेली दिसत आहे. यानंतर दोन चाहते हे सपना चाैधरी हिचे पाय पाण्याने धुतात. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या या सपना चाैधरी हिच्या पायावर टाकल्या जातात. पुढे यामधील एक चाहता चक्क सपना चाैधरी हिचे पाय धुतलेले पाणी पितो.
हा चाहता ज्यावेळी सपना चाैधरी हिचे पाय धुतलेले पाणी पितो हे पाहुण तिथे उपस्थित असलेल्यांना धक्का बसतो. मात्र, हा चाहता सपना चाैधरी हिच्या पाय धुतलेले पाणी आनंदाने पिताना दिसत आहे. आता हाच सपना चाैधरी हिचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मात्र, अनेक लोकांना सपना चाैधरी हिचा हा व्हिडीओ अजिबातच आवडला नाहीये.
सपना चाैधरी हिच्या या व्हिडीओवर अनेकांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यास सुरूवात केलीये. एकाने लिहिले की, काय हा प्रकार आहे? दुसऱ्याने लिहिले की, ही सपना चाैधरी देव वगैरे आहे का? तिसऱ्याने लिहिले की, हा माणूस मला थोडा पागलच दिसत आहे, सपना चाैधरी ही फक्त एक डान्सर आहे भावा देव नाहीये. या व्हिडीओवरून अनेकांनी सपना चाैधरी हिला टार्गेट करण्यास देखील सुरूवात केलीये.