मुंबई : रोनित रॉय यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये गाजवलाय. रोनित रॉय याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये त्यांनी धक्कादायक खुलासे केले. रोनित रॉय थेट म्हणाले, माझा पहिला चित्रपट जान तेरे नाम 1992 मध्ये रिलीज झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट हिट ठरला. मात्र, त्या चित्रपटानंतर मला सहा महिन्यात एकही काॅल आला नाही. त्यानंतर मला खराब काम मिळाले. हातामध्ये काहीच नसल्याने मी काम केले. तीन वर्षे माझ्याकडे काम होते. मात्र, त्यानंतर माझ्या आयुष्यात अत्यंत खतरनाक वेळ आली. मला अजिबातच काम मिळत नव्हते. माझ्याकडे अजिबात पैसे राहिले नाही.
पुढे रोनित रॉय म्हणाले, त्यावेळी माझ्याकडे एक छोटी गाडी होती. मात्र, माझी अवस्था अशी झाली की, साधे त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याइतके देखील माझ्याकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत. पेट्रोलच काय तर माझ्याकडे एकवेळ जेवणासाठी देखील पैसे नव्हते. मला काय करावे हेच मुळात सुचत नव्हते आणि माझ्यासोबत काय घडतंय हे देखील कळण्यास मार्ग नव्हता.
एक टाईमचे जेवायला देखील पैसे नसल्याने मी जेवण्यासाठी माझ्या आईच्या घरी जात असत. कारण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. पण मी स्वत: मारले नाही. मुळात म्हणजे जवळपास सर्वांनाच या परिस्थितीमधून आयुष्यात जावे लागते. मी त्यामधून बऱ्याच गोष्टी नक्कीच शिकल्या. मात्र, मी कधीच आयुष्यात हार मानली नाही. माझ्यासाठी तो काळ मोठा होता.
मुळात म्हणजे रोनित रॉय यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आज रोनित रॉय हे एक अत्यंत मोठे नाव नक्कीच आहे. मात्र, इथंपर्यंत येण्यासाठी रोनित रॉय यांनी खूप मोठा संघर्ष हा नक्कीच केलाय. रोनित रॉय हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. मात्र, एकेकाळी त्यांना एकवेळेच्या जेवण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागलाय.
रोनित रॉय हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रोनित रॉय हे दिसतात. रोनित रॉय यांनी हलचल, जालसाज, पंख, उडान, 2 स्टेट्स, सरकार 3, लाईगर, राम लखन, तहकीकात, लक्ष्य या चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे फक्त चित्रपट नाही तर मालिकांमध्येही यांनी धमाल ही नक्कीच केलीये.