मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा बघायला मिळतंय. इतकेच नाही तर ऐश्वर्या राय हिने चक्क अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे पोहचले होते. मात्र, दोघेही वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आले. इतकेच नाही तर ऐश्वर्या राय हिच्या चेहऱ्यावर अभिषेक बच्चन याला पाहून वेगळेच भाव बघायला मिळाले. अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, लवकरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे विभक्त होणार आहेत. यामुळे यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच आता बाॅलिवूडमधील एक दुसरे जोडपे देखील घटस्फोटाच्या मार्गावर असल्याची तूफान चर्चा आहे. नुकताच बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा करण जोहर याच्या शोमध्ये पोहचला. यावेळी अजय देवगण याने केलेले विधान ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत.
अजय देवगण याने थेट म्हटले की, सिंगल राहणेच कधीही चांगले आहे. आता अजय देवगण याच्या याच विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. अजय देवगण याचे हे विधान ऐकून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेकांनी तर थेट म्हटले की, अजय देवगण आणि काजोल हे विभक्त होणार आहेत का? मात्र, यावर काजोल हिने काहीच भाष्य केले नाहीये.
काजोल आणि अजय देवगण यांच्या लग्नाला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुले देखील आहेत. खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याप्रमाणेच अजय देवगण आणि काजोल यांच्या देखील नात्यामध्ये दुरावा आला आहे का? हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. काजोल आणि अजय देवगण यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.
अजय देवगण याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अजय देवगण याचे चित्रपट चांगलाच धमाका करताना देखील दिसत आहेत. काजोल हिची देखील काही दिवसांपूर्वीच वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. काजोल सोशल मीडियावर सक्रिय असून खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.