पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शोएब मलिक हा त्याच्या क्रिकेटमुळे नव्हे तर त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. शोएब मलिक याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. शोएब मलिक याने काही दिवसांपूर्वीच आपल्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाल्यानंतर शोएबने हे लग्न केल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे शोएब मलिक याचे सना जावेद हिच्यासोबतचे हे तिसरे लग्न आहे. शोएब मलिक याच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नाला आता अवघे काही दिवस झालेले नसताना लगेचच शोएब मलिक याच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले. यानंतर युजर्स शोएब मलिक याचे हे तिसरे लग्न देखील फार काळ टिकणार नसल्याचे म्हणताना दिसत आहेत.
शोएब मलिक हा सना जावेद हिच्यासोबत लग्न झाल्यानंतरही एका पाकिस्तानी अभिनेत्रीला फ्लर्ट करत असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर आपण स्क्रीनशॉट सांभाळून ठेवल्याचे सांगताना देखील ही अभिनेत्री दिसली. यानंतर आता विविध चर्चांना उधाण आल्याचे देखील बघायला मिळतंय. सानियासोबतच्या घटस्फोटानंतरच चर्चा होती की, शोएब मलिक याचे विवाहबाह्य संबंध असल्याने सानियाने त्याला घटस्फोट दिला.
पाकिस्तानी अभिनेत्री नवल सईद ही नुकताच एका शोमध्ये पोहचली. यावेळी नवल सईद हिने काही धक्कादायक खुलासे केले. यावेळीच्या शोच्या होस्टने नवल हिला विचारले की, तुला अभिनेत्यांचे फ़्लर्टी मेसेज येतात का? यावर नवल सईद म्हणाली की, अभिनेत्यांचे नाही पण मला पाकिस्तानी क्रिकेटरचे फ़्लर्टी मेसेज कायमच येतात, त्यांनी असे नाही केले पाहिजे, ते देशाचे प्रतिनिधित्व करतात.
यावेळी नवल सईद म्हणाली की, मी सर्व मेसेजचे स्क्रीनशॉट सांभाळून ठेवले आहेत. यावेळी होस्ट शोएब मलिक मेसेज करतो का? विचारतो. यावेळी नवल सईद हिने इशाऱ्या इशाऱ्यामध्ये हो म्हटले. शोएब मलिकचे नाव घेताच नवल सईद हा हासायला देखील लागते. यावरून आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांनी थेट म्हटले की, बरे झाले की, सानिया मिर्झा हिने याच्यासोबत घटस्फोट घेतला.