मुंबई : शोएब मलिक याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आणि लोक हैराण झाले. शोएब मलिक याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याच्या तिसऱ्या लग्नाचे थेट फोटो शेअर केले. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. शोएब मलिक याच्यावर जोरदार टीका ही होताना दिसली. हेच नाही तर अनेकांनी थेट सानिया मिर्झा हिला देखील खडेबोल सुनावले. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला, याबद्दल फार काही कळू शकले नाही. मात्र, अशी एक चर्चा होती की शोएबचे विवाहबाह्य संबंध असल्याने सानियाने घटस्फोट घेतला.
भारतीय लोक हे शोएब मलिक याला सोशल मीडियावर चांगलेच खडेबोल सुनावताना दिसले. मात्र, आता चक्क शोएब मलिक याच्या सपोर्टमध्ये एक पाकिस्तानी अभिनेत्री उतरली आहे. या अभिनेत्रीचे बोलणे ऐकून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे देखील बघायला मिळतंय. या पाकिस्तानी अभिनेत्रीने थेट सानिया मिर्झाबद्दलची धक्कादायक विधाने केली आहेत.
पाकिस्तानी अभिनेत्री हिरा सूमरो हिने खळबळजनक खुलासा केला. हिरा सूमरो म्हणाली की, शोएब मलिकने असे काय केले? त्याला असे करण्याची वेळ का आली, असे ऐवढी चर्चा का करत आहात? यावर होस्ट म्हणाला की त्याने इंडियाची भाभी सोडली, यामुळे लोक त्याच्यावर नाराज आहेत. तसे तर तो सानिया मिर्झाला ठेऊनही चार लग्न करू शकतो.
पुढे हिरा शूमरो म्हणाली की, मला खरोखरच कळत नाहीये, लोकांना दु:ख कशाचे आहे भाभी सोडली म्हणून की नवीन भाभी आणली याचे. सानियाने म्हटले की, तिने स्वत:च खुला केलाय. पुढे ती म्हणाली की, असेही होऊ शकते की सानियाला शोएब कळूच शकला नसेल. लग्नानंतर बरेच लोक दहा दहा गर्लफ्रेंड ठेवात असेही शूमरो हिने म्हटले.
आता शूमरो हिला लोक खडेबोल सुनावताना दिसत आहेत. अनेकांचे म्हणणे आले की, हिला सानिया मिर्झा हिचाच प्राॅब्लेम दिसतोय. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा निकाह हैद्राबाद येथे पार पडले. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे दुबईमध्ये राहत होते. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिने अनेक भावनिक पोस्ट या सोशल मीडियावर शेअर केल्या, ज्याची तूफान चर्चा ही रंगताना दिसली.