Teaser | सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या चित्रपटाचे टीझर रिलीज, एकाच चित्रपटातून होणार तीन स्टारकिड्स लाॅन्च

| Updated on: Jun 18, 2023 | 4:01 PM

द आर्चीज हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. द आर्चीज या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या चित्रपटातून तब्बल तीन स्टारकिड्स हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय.

Teaser | सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या चित्रपटाचे टीझर रिलीज, एकाच चित्रपटातून होणार तीन स्टारकिड्स लाॅन्च
Follow us on

मुंबई : द आर्चीज हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ‘द आर्चीज‘ (The Archies) या चित्रपटाची घोषणा झाली तेंव्हापासूनच हा चित्रपट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. कारण या चित्रपटातून तब्बल तीन स्टारकिड्स हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर, शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गाैरी खान यांची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चन हिचा मुलगा अगस्त्य नंदा (Agastya Nanda) हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. एकाच चित्रपटातून तब्बल तीन स्टारकिड्सला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले जात असल्याने हा चित्रपट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर बघायला मिळतोय.

द आर्चीज चित्रपटाला जास्त विरोध नको म्हणून निर्मात्यांनी मोठी खेळी खेळत थेट हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय सुरूवातीलाच घेतला. काही दिवसांपूर्वीच द आर्चीज चित्रपटाचे नवे पोस्टर हे रिलीज करण्यात आले. या पोस्टरमध्ये शाहरुख खान याची लेक सुहाना ही अत्यंत वेगळ्या लूकमध्ये बघायला मिळाली होती.

नुकताच आता द आर्चीज चित्रपटाचे टीझर रिलीज करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सने द आर्चीज चित्रपटाने हे टीझर रिलीज केले आहे. या टीझरमध्ये भारतामधील एक जुने रेल्वे स्टेशन हे दिसत आहे. यामध्ये काही मित्र धमाल करताना देखील दिसत आहे. या चित्रपटाची स्टोरी ही काही मित्रांच्या भोवती फिरताना दिसत आहे.

इतकेच नाही तर ब्रेकअप रोमान्स हे सर्वकाही चित्रपटात बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिच्यानंतर आता तिची लहान बहीण खुशी कपूर ही देखील द आर्चीज चित्रपटाच्या माध्यमातून धमाकेदार पध्दतीने बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची तरूणांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. कारण काॅलेज लाईफवर हा चित्रपट आहे.

शाहरुख खान याच्यासाठी हे वर्षे अत्यंत खास ठरणार आहे. कारण याच वर्षाच्या सुरूवातीला शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आणि त्याचा पठाण हा चित्रपट हिट ठरला. याचवर्षी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे तर दुसरीकडे मुलगी सुहाना ही देखील चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे.