सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर एकच खळबळ बघायला मिळाली. अभिनेत्याचे चाहतेही चिंतेत आले. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याचे प्लॅनिंग गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याची हैराण करणारी माहिती पुढे आली. हे दोन्ही हल्लेखोर होळीनंतर चार दिवसांनी मुंबईत दाखल झाले. मुंबईमध्ये कामासाठी जात असल्याचे घरच्यांना सांगून हल्लेखोरांनी मुंबई गाठली. अनेक दिवस या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराची रेकी केल्याची देखील माहिती मिळत आहे. अनमोल बिश्नोई हा या दोन्ही हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले जाते.
आता नुकताच एक अत्यंत हैराण करणारी माहिती पुढे येतंय. या हल्लेखोरांनी सलमान खान याच्या पनवेल येथील फार्म हाऊसच्या अवघ्या दहा किलो मीटर दूर प्लॅट किरायाने घेतला होता. सलमान खान याच्या फार्म हाऊसच्या इतक्या जवळ फ्लॅट घेण्याचे काही मोठे कारण या हल्लेखोरांचे असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून या हल्लेखोरांची कसून चाैकशी केली जातंय.
काही दिवसांपूर्वी असे सांगितले गेले होते की, सलमान खान याच्या फार्म हाऊसवर त्याला जीवे मारण्याचा प्लॅन लॉरेन्स बिश्नोई याचा होता. मात्र, तो प्लॅन फसला. या हल्लेखोरांनी देखील सलमान खानच्या फार्म हाऊस जवळच फ्लॅट घेतला. मात्र, त्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार केला. ज्यावेळी सलमान खान हा आपल्या कुटुंबियांसोबत घरातच होता.
सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणारे हे दोन्ही हल्लेखोर बिहारमधील आहेत. यांच्या घरच्यांना या गोळीबाराबद्दलच काहीच कल्पना नसल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर दोन्ही हल्लेखोर मुंबईला कामाला जात असल्याचे सांगून मुंबईत दाखल झाले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे याबद्दल हल्लेखोरांच्या घरच्यांना माहिती मिळाली.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारा सागर श्रीजोगेंद्र पाल याच्या वडिलांनी म्हटले की, मी एक रोजंदारी मजूर आहे. मला सोशल मीडियावरून कळाले की, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारामध्ये माझा मुलगा सहभागी आहे. मी ज्यावेळी ते एकले त्यावेळी धक्का बसला. जे काही घडले त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तो काही वर्षांपूर्वी जालंधरला काम करत होता.