माधुरी दीक्षितच्या डॉक्टर नवऱ्याकडून खास टिप्स, जेवण बनवण्यासाठी कोणतं तेल वापरावं?

| Updated on: Jul 13, 2024 | 10:44 AM

Madhuri Dixit Husband Doctor Shriram Nene: जेवण बनवण्यासाठी 'हे' 5 तेल उत्तम पर्याय, माधुरी दीक्षितच्या डॉक्टर नवऱ्याकडून जाणून खास टिप्स, व्हिडीओ पोस्ट करत नेने यांनी सांगितले कोणते पाच प्रकारचे तेल आहेत आरोग्यासाठी लाभदायक

माधुरी दीक्षितच्या डॉक्टर नवऱ्याकडून खास टिप्स, जेवण बनवण्यासाठी कोणतं तेल वापरावं?
Follow us on

अभिनेत्री मधुरी दीक्षित वयाच्या 57 व्या वर्षी देखील प्रचंड सुंदर दिसते. पन्नाशीत पोहोचल्यानंतर देखील मधुरीचं सौंदर्य कमी झालं नाही. माधुरी कायम चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्रीचे पती डॉक्टर श्रीराम नेने देखील कायम सर्वांना फिट राहण्यासाठी सांगत असतात. आता देखील माधुरी दीक्षित यांचे पती श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी जेवण बनवताना कोणत्या तेलाचा वापर करायचा हे सांगितला आहे.

सध्या नेने यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोणते पाच तेल आरोग्यासाठी लाभदायक असतात हे सुद्धा श्रीराम नेणे यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. सांगायचं झालं तर श्रीराम नेने हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीराम नेने हे सर्वांना फिट राहण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी लागणाऱ्या टिप्स देत असतात.

राईस ब्रेने ऑईल पॉली आणि मोनो अनसॅचुरेटेड फॅक्ट्सचा फार मोठा स्त्रोत आहे. या तेलाचा जेवण बनवण्यासाठी वापर केल्यास शरीरात कोलेस्ट्राल प्रमाणात राहतं. ज्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास कमी होतो. असं देखील डॉक्टर सांगतात. जेवण बनवण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचं तेल देखील वापरु शकता. शेंगदाण्यांच्या तेलाचा वापर केल्यामुळे तुम्ही शारीरातील फॅट आणि शरीराला ई व्हिटॅमीन मिळतं. शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केल्यामुळे शारीरात अनसॅचुरेटेड फॅटच्या जागी सॅचुरेटेड फॅट तयार होतं. ज्यामुळे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रालचं प्रमाण नियंत्रणात राहातं.

 

जेवण बनवण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता. मोहरीच्या तेलाचा वापर केल्यामुळे तुमचा रक्त दाब नियंत्रणात राहातो. शिवाय तुम्ही हृदयविकाराच्या आजारांपासून देखील दूर राहाता. तर ऑलिव्ह ऑईल सर्वात योग्य पर्याय आहे. या तेलाचा वापर केल्यामुळे तुम्ही क्रेनिक आजारांपासून दूर राहाल.

तिळाचं तेल देखील चांगला पर्याय आहे.. तिळाच्या तेलात ओमेगा 3, ओमेगा – 6 आणि ओमेगा -9 फॅटी ऍसिट असतं. तिळाच्या तेलाचा वापर केल्यास तुमचा रक्त दाब नियंत्रणात राहातो… असं देखील डॉक्टर म्हणतात. पण तुम्हाला कोणता आजार असेल, तर तुमच्या डॉक्टरांना विचारून अन्न-पदार्थ आणि डाएटमध्ये बदल करा.