मुंबई : दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. पण सिनेमाला होणाऱ्या विरोधाचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नाही. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा वाद अद्यापही शमलेला नसताना, आता ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्यास आपली हत्या केली जाईल, अशी भीती सिनेमाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना वाटत आहे. एवढंच नाही तर, सनोज मिश्रा यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यांना तुरुंगात पाठवलं जाऊ शकते आणि तिथे त्यांची हत्या होऊ शकते, असा आरोपही सनोज मिश्रा यांनी केला आहे.
सनोज मिश्रा यांनी फेसबुकवरील पोस्ट केली आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिग्दर्शकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मदतीची विनंती केली आहे. सध्या सर्वत्र दिग्दर्शक सनोज मिश्रा आणि ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
#WATCH | Sanoj Mishra, director of the Hindi film “The Diary of West Bengal” speaks on the notice severed to him by the West Bengal police alleging that the director is trying to defame Bengal with this film, says, “My intention is not to malign the image of the state. We have… https://t.co/N00BlnwqOx pic.twitter.com/SOrakPdjCe
— ANI (@ANI) May 26, 2023
सांगायचं झालं तर, सनोज मिश्राविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या सिनेमातून पश्चिम बंगालची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले. तक्रार दाखल केल्यानंतर सनोज मिश्रा यांना पोलिसांनी चौकशीसाठी देखील बोलावलं होतं.
सनोज मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार ,’द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ सिनेमा न पाहता, केवळ ट्रेलरच्या आधारे त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे. आता त्यांना तुरुंगात टाकून त्यांची हत्या केली जावू शकते.. अशी भीती सनोज मिश्रा यांना सतावत आहे.
सनोज मिश्रा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे . त्या पोस्टमध्ये त्यांनी मदतीचे आवाहनही केले आहे. सनोज मिश्रा यांनी म्हटले आहे की, केवळ सत्य बोलण्यासाठी त्यांचा छळ केला जात आहे. सिनेमा बनवून त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. सध्या सर्वत्र सनोज मिश्रा यांची चर्चा आहे…