Junior Mehmood : शेवटची इच्छा व्यक्त करत प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास; सिनेविश्वावर शोककळा

| Updated on: Dec 08, 2023 | 8:08 AM

Junior Mehmood : शेवटची इच्छ व्यक्त करत प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास, डॉक्टरांनी सांगितलं होतं फक्त शेवटचे 40 दिवस आहेत... अनेक सेलिब्रिटींनी घेतली शेवटची भेट आणि...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या निधनाची चर्चा...

Junior Mehmood : शेवटची इच्छा व्यक्त करत प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास; सिनेविश्वावर शोककळा
Follow us on

मुंबई | 8 डिसेंबर 2023 : 1970 मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेते ज्युनियर महमूद (junior mehmood) यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्युनियर महमूद कर्करोगाच्या चौथ्या स्टेजवर होते. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ज्युनियर महमूद यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. एवढंच नाही तर, रुग्णालयातून घरी आणल्यानंतर देखील त्यांच्यावर घरी उपचार सुरु होते. ज्युनियर महमूद यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ज्युनियर महमूद यांच्याकडे फक्त शेवटचे 40 दिवस शिल्लक होते. अशात अनेक सेलिब्रिटी ज्युनियर महमूद यांची शेवटची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते.

विनोदवीर जॉनी लिव्हर, अभिनेते जितेंद्र, सचिन पिळगावकर, मास्टर राजू यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी ज्युनियर महमूद यांची शेवटची भेट घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ज्युनियर महमूद यांनी निधनापूर्वी शेवटची इच्छा व्यक्त केली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्युनियर महमूद यांची चर्चा रंगत आहे.

काय होती ज्युनियर महमूद यांची शेवटची इच्छा?

शेवटची इच्छा व्यक्त करत ज्युनियर महमूद म्हणाले होते की, ‘माझं निधन झाल्यानंतर चार लोकं मला चांगले म्हणाले पाहिजे.. चांगला माणूस होता… अनेक जण असं म्हणाल्यानंतर समजून जाईल की मी सर्वकाही जिंकलं आहे.. ‘ एवढंच नाहीतर ज्युनियर महमूद यांनी जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.

ज्युनियर महमूद यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर जितेंद्र आणि सचिन पिळगावकर अभिनेत्याच्या घरी देखील गेले होते. ज्युनियर महमूद यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वयाच्या 67 वर्षी ज्युनियर महमूद यांनी अखेरचा श्वास घेतला. पोटाच्या कर्करोगामुळे ते त्रस्त होते.

रिपोर्टनुसार, ज्युनियर महमूद यांचं निधन त्यांच्या राहत्या घरी झालं आहे. ज्युनियर महमूद यांचे उपचार टाटा मेमोरियल रुग्णालयात सुरु होते. पण कर्करोगाशी ज्युनियर महमूद यांची झुंज अपयशी ठरली. ज्युनियर महमूद यांनी ‘हाथी मेरे साथी’, ‘कारवां’ आणि ‘मेरा नाम जोकर’ यांसारख्या अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.