मुंबई : द कपिल शर्मा याच्या शोमधून सुनील ग्रोवर (Sunil Grover) याने प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले आहे. मात्र, कपिल शर्मा याच्यासोबत झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवर याने कायमचा द कपिल शर्मा (The Kapil Sharma) या शोला रामराम केला. मात्र, अजूनही चाहते हे सुनील ग्रोवर याची वाट पाहतात. सुनील ग्रोवर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सुनील ग्रोवर हा दिसतो. सुनील ग्रोवर याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून सुनील ग्रोवर याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सुनील ग्रोवर याचा असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सुनील ग्रोवर याचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. सुनील ग्रोवर याच्या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सुनील ग्रोवर हा चक्क मक्याचे कणीस भाजताना दिसत आहे. या गाड्यावर शेंगा, कैरी, पेरू अशा बऱ्याच गोष्टी विकायला ठेवलेल्या दिसत आहेत. विशेष म्हणजे भर पावसामध्ये मक्याचे कणीस भाजताना सुनील ग्रोवर दिसतोय. हे कणीस भाजताना त्याला मोठे कष्ट घ्यावे लागत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
आता हा व्हिडीओ पाहून सुनील ग्रोवर याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. काम मिळत नसल्याने ही वेळ सुनील ग्रोवर याच्यावर आलीये का? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, सुनील ग्रोवर सर तुम्ही कधी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहात? आम्ही तुमची वाट पाहून थकून गेलो आहेत.
दुसऱ्या एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, सर आम्ही तुम्हाला खूप जास्त मिस करत आहोत. तिसऱ्याने लिहिले की, परत एकदा तुम्हाला कपिल शर्माच्या शोमध्ये बघण्याची इच्छा आहे. सुनील ग्रोवर हा शाहरूख खान याच्या पठाण या चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.